##इतिहासात डोकावताना##
*जन्म-1981-महेंद्रसिंग धोनी.
1914-अनिल विश्वास भारतीय संगीतकार
*मृत्यू-1999-भारतीय क्रिकेट खेळाडू
एम .एल.जयसिंह
चालू घडामोडी 07 जुलै 2021
1.जेष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे 98 व्या वर्षी निधन.
2.केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला आहे.43 नव्या मंत्र्यांचा या मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे.यामध्ये महाराष्ट्रातील 3 मंत्र्यांचा समावेश आहे,तर 12 मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला आहे.
3.महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू म्हणून डॉ.माधुरी राजीव कानिटकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी ही नियुक्ती जाहीर केली.2017 ते 2019 या काळात डॉ कानिटकर यांनी सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालायच्या अधिष्ठाता म्हणून काम पाहिले आहे.
4.एमपीएससी मार्फत 15511 पदे भरणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घोषणा केली आहे.
5.8 राज्यांमध्ये नवीन राज्यपालांची नियुक्ती करण्यात आली आहे.राष्ट्रपती रामनाथ कोविड यांनी काही राज्यपाल बदलण्यास मान्यता दिली आहे.
6.आदिवासींना वणावर अधिकार देण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेतला आहे.अनुसूचित जमाती व वन मंत्रालयाने एकत्रित रित्या परिपत्रक जारी केले आहे,यानुसार ग्रामसभेला व्यवस्थापनाचे अधिकारबदेण्यात आले आहेत.
7.रिपोर्ट्स विथ आउट बॉर्डर या माध्यमांच्या निरीक्षण संस्थेने जगभरातील माध्यम स्वातंत्र्यावर गदा आणणाऱ्या प्रमुख व्यक्तींची यादी जाहीर केली आहे.यात एकूण 180 देशांचा समावेश आहे त्यात भारताचा 142 व क्रमांक आहे.
No comments:
Post a Comment