Monday, July 12, 2021

चालू घडामोडी 12 जुलै

 


##इतिहासात डोकावताना##

*जन्म-1864-इतिहासाचार्य वि.का.राजवाडे

1965-भारताचे माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर

*मृत्यू-200-मराठी कवयित्री-इंदिरा संत


चालू घडामोडी 12 जुलै

1.प्रसिद्ध गझलकार व पत्रकार मधुसूदन नानिवडेकर यांचे निधन.ते नवव्या अखिल भारतीय गझल संमेलनाचे ते अध्यक्ष होते.


2.मुंबई उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश व सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश सुजाता मनोहर यांचा रूथ ब्याडर जीन्सबर्ग मेडल ऑफ ऑनर ने सन्मानित करण्यात आले आहे.या पुरस्काराने सन्मानित होणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला न्यायाधीश ठरल्या आहेत.वर्ल्ड जुरीयेस्ट असोसिएशन आणि वर्ल्ड लॉ असोसिएशनचा हा पुरस्कार सोहळा माद्रिदमधून ऑनलाइन पार पडला.


3.मागील दोन वर्षात विवरणपत्र न भरणार्यांना आता जास्त टीडीएस भरावा लागणार आहे.प्राप्तिकर 50000 हजारपेक्षा जास्त असणाऱ्या करदात्यांच्या अधिक टीडीएस कापला जानार आहे .


4.देशाचे रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर येथे  देशातील पहिल्या  एलएनजी स्टेशनचे उदघाटन केले.लिक्विडीफाईड न्याचूरल गॅस हे  एक प्रदूषण रोखणार व स्वस्त इंधन आहे व यामुळे भविष्यात क्रांती घडेल असे त्यांनी म्हटले आहे. 


5.अफगाणिस्तान मधील काही भागांवर तालिबानने कब्जा केला असून कंदहार मधील परिस्थिती बिघडू लागली आहे त्या पार्श्वभूमीवर भारताने कंदाहार मधील दूतावासातील 50राजनैतिक अधिकारी व सुरक्षा रक्षकांना भारतात वापस आणण्यासाठी खास विमान पाठवले आहे.परराष्ट्र मंत्रालयाने तसे स्पष्ट केले आहे.


6.सारबीयाच्या नोवाक जोकोविचने विम्बल्डन  पुरुष एकेरी  टेनिस स्पर्धेचा विजेता ठरला.हे त्याच्या कारकिर्दीतले त्याचे सहावे विम्बल्डन जेतेपद .

7.कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ब्राझीलला हरवत अर्जेंटिनाचा संघ 28 वर्षांनंतर मोठी स्पर्धा जिंकला आहे.अर्जेंटिनाने 15 व्यांदा कोपा अमेरिका स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे.

 

8.भारतीय वंशाच्या समीर बॅनर्जी याने विम्बल्डन कुमार टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे.अमेरिकेकडून खेळताना त्याने अमेरिकेच्या व्हिक्टर लिलाव याला हरवले.


9.नीती आयोगाने भारताचा आर्थिक विकास दोन आकडी राहण्याची आशा व्यक्त केली आहे.



10.अब्जाधीश रिचर्ड ब्रँसन हे स्वतःच्या अंतराळ यानातून अंतराळात पोहचले आहेत .व्हर्जिन गल्याक्तिक या त्यांच्या कम्पणीच्या युनिटी नावाच्या अंतराळ यानातून ते अंतराळात गेले आहेत.


No comments:

Post a Comment