Monday, May 31, 2021

*चालू घडामोडी 31 मे

 *चालू घडामोडी 31  मे

##इतिहासात डोकावताना##


*जन्म-

*1725-पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर

*1910-बालसाहित्यकार भारा. भागवत

*मृत्यू-

*1874-समाजसेवक-भाऊ दाजी लाड

चालू घडामोडी -


1.सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर मराठा समाजाला आर्थिक दुर्बल घटकांमधून शिक्षण व नोकरीत 10 टक्के राखीव देण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे.


2.मल्टिप्लिसीटीज या पुस्तकाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन.



3.केंद्र सरकार सर्व राज्यांना जून महिन्याध्ये 6.09कोटी लसींच्या मात्रा राज्यांना विनामूल्य उपलब्ध करून  देणार आहे.


4.भारतीय लष्कराचे आधुनिकीकरण योग्य दिशेने सुरू असल्याचे लष्करप्रमुख एम.नरवणे यांनी म्हटले आहे.


5.आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत झालेल्या दरवाढीचा परिणाम म्हणून खाद्यतेलाच्या किमती गेल्या 11 वर्षांमधील उच्चांकी पातळीवर पोहचल्या आहेत.भारताला सुमारे ,56 टक्के खाद्यतेल आयात करावे लागते.



6.आशियाई बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेमध्ये भारताच्या पूजा राणी हिने सलग दुसरे सुवर्णपदक कमावले आहे.


7.चीनचे स्वयंचलित तिणझोऊ 3हे  मालवाहू यान चीनच्या नवीन अंतराळ केंद्रावर दाखल झाले आहे.


Thursday, May 27, 2021

चालू घडामोडी 27 मे

 **इतिहासात डोकावताना**

*1986-युरोपमधील सर्व देशांनी युरोपिअन संघाचा धवज स्वीकारला.

*1999-भारत व पाकिस्तान दरम्यान कारगिल युद्धास सुरुवात.


*जन्म-

*1938-प्रसिद्ध मराठी कादंबरीकार भालचंद्र नेमाडे 

*1962-भारतीय क्रिकेटर देवी शास्त्री 

*मृत्यू-

*1935-रमाबाई भीमराव आंबेडकर

*1964-भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू.


*चालू घडामोडी-27मे 2021


1.राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजने अंतर्गत केशरी शिधापत्रिका धारकांना जुनमध्येही सवलतीच्या दरात अन्न धान्याचा पुरवठा होणार आहे.


2.सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये पहिल्यांदाच गिफ्रॉन या गिधाडांच्या प्रजातीची नोंद करण्यात आली आहे .हा पक्षी तिबेट,पाकिस्तान,भूतान,नेपाळ,चीन,युरोप, मध्ये मुख्यत्वे आढळतो.


3.जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक एच एस दोरायस्वामी यांचे निधन,भारत छोडो आंदोलनात त्यांचा सहभाग होता.


4.3 जुलै ला होणारी jee एडवांस परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.


5.महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम 1981 नुसार 1 जून ते 31 जुलै दरम्यान मासेमारी बंद ठेवण्याचे आदेश मत्स्य व्यवसाय विभागाने दिले आहेत.


6.केंद्राने जारी केलेल्या माहिती तंत्रज्ञान विषयक नव्या नियमाच्या विरोधात व्हाट्सप ने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखलबकेली आहे.


7.अमेझॉन या इ टेल कम्पनी ने चित्रपट निर्मिती करणारी मेट्रो गोल्डविन मेयर ही कम्पनी विकत घेतली आहे.8.45अब्ज डॉलरचा हा व्यवहार आहे.



8.आयसीसीने जारी केलेल्या वनडे रँकिंगमध्ये फलंदाजी क्रमवारीत  विराट कोहली व रोहित शर्मा अनुक्रमे द्वितीय व तृतीय स्थानी आहेत.गोलंदाजीमध्ये जसप्रीत बुमराह पाचव्या स्थानी आहे.



9.अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन व रशियाचे अध्यक्ष ब्लादमीर पुतीन यांच्यात जूनमध्ये जीनेव्हा येथे 16 जुनला बैठक होणार आहे.दोन्ही देशातील संबंध सुधारण्याच्या दृष्टीने ही महत्वाची बैठक असेल.


Tuesday, May 25, 2021

चालू घडामोडी 26 मे

 **इतिहासात डोकावताना**

*1986-युरोपमधील सर्व देशांनी युरोपिअन संघाचा धवज स्वीकारला.

*1999-भारत व पाकिस्तान दरम्यान कारगिल युद्धास सुरुवात.


*जन्म-

*1885-राम गणेश गडकरी-मराठी नाटककार

*1906-भारतीय कृषी संशोधक-बेंजामिन पाल


*चालू घडामोडी-26मे 2021


1.सर्वोच्च न्यायालयातील चालू खटल्याच्या पार्श्वभूमीवर शासकीय नोकरभरतीमध्ये प्रभावित झालेल्या मराठा उमेदवारांना न्याय देण्यासाठी पुढच्या आठवड्यात मंत्रिमंडळ बैठकीत हा प्रस्ताव मांडण्यात येणार आहे.


2.सरासरीपेक्षा जास्त पोझीटीव्हीटी रेट 

जास्त असलेल्या 18 जिल्ह्यामध्ये गृह विलगिकर्ण ऐवजी कोरोना रुग्णांना कोविड सेंटरमध्ये रहेवण्यावर भर देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला.


3.सीबीआय च्या संचालक पदी सुबोध कुमार जयस्वाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.


4.महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी)ने पीएसआय (पोलीस उपनिरीक्षक) पदाच्या भरती संदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. पीएसआय पदाची मुलाखत देण्यासाठी शारीरिक क्षमता चाचणीत 60 टक्के गन मिळवणे आवश्यक आहे.



5.प्रसिद्ध तमाशा कलाकार कांताबाई सातारकर यांचे निधन.तमाशातील वग सम्राग्नी अशी त्यांची ओळख होती.


6.राज्यातील जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या प्रशासकीय जिल्हातर्गत व आंतरजिल्हा  बदल्या ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.


7.भारतातील लसीकरणास चालना देण्यासाठी फायझर या अमेरिकेच्या कोरोना प्रतिबंधक लस उत्पादक कंपनीने 2021 मध्ये भारताला 5 कोटी लसीचे डोस उपलब्ध करून देण्याची तयारी दाखवली आहे.


8.हायब्रिड तांदळाचे जनक म्हणून ओळखले जाणारे चीनचे प्रसिद्ध कृषी संशोधक युआन लॉंगपिंग यांचे निधन.


9.भारताचा ऑलिम्पिक पदक विजेता मल्ल सुशीलकुमार याला सेवेतून निलंबित करण्याचे उत्तर रेल्वेने आदेश जरी केला आहे.कुस्तीपटू सागर धनकारच्या खुनाचा आरोप सुशीलकुमार वर ठेवण्यात आला आहे.


10.जपानमधील वाढत्या कोरोना रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर अमेरिकन नागरिकांनी जपानमध्ये प्रवास करू नये असा अमेरिकन नागरिकांना अमेरिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी दिला आहे.


Monday, May 24, 2021

*चालू घडामोडी-24मे 2021

 **इतिहासात डोकावताना**

*2000-इस्रोचा इनस्याट 3 बी हा उपग्रह राष्ट्राला अर्पण करण्यात आला.

2001-18व्या वर्षी एव्हरेस्ट सर करणारा शेरफ तेब्बा हा सर्वात लहान व्यक्ती ठरला.


*जन्म-

1924-रघुवीर भोपळे-जागतिक कीर्तीचे जादूगार

1942-माधव गाडगीळ -पर्यावर्णतज्ञ 


*चालू घडामोडी-24मे 2021


1.दहावी ची परीक्षा रद्द केल्यानंतर आता बारावीच्या परीक्षा देखील रद्द करण्याकडे राज्य सरकारचा कल दिसतोय. 12 वीच्या परिक्षेबाबत केंद्रीय स्तरावर झालेल्या बैठकीत राज्याच्या शिक्षण विभागाने 12 वीच्या परीक्षेस पर्याय शोधावा अशी भूमिका मांडली आहे.


2.अनाथांना 23 व्या वर्षापर्यंत अनाथ आश्रमात राहत येईल असा निर्णय राज्याच्या महिला व बालकल्याण विभागाने घेतला आहे.


3.बारावीच्या परिक्षांबाबत येत्या 1 जुनला निर्णय घेण्याची घोशना केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निःशंक यांनी केली आहे.


4.गोव्यामध्ये दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी जाहीर केले आहे.


5.हरियानामधील जननायक पार्टीचे आमदार ईश्वर सिंह 73 व्या वर्षी राज्यशास्त्र विषयातून एमए ची परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत.


6.दिल्ली विद्यापीठाच्या संशोधकांनी सापांच्या आठ नव्या प्रजातींचा शोध लावला आहे.



Sunday, May 23, 2021

23 मे 2021 चालू घडामोडी

 *चालू घडामोडी-23मे 2021


1.मराठी साहित्यिक कवि सुधाकर गायधनी यांना कोलंबिया, बांगलादेश,पेरू या देशांमधील जागतिक साहित्य संस्थांकडून लागोपाठ तीन जागतिक पुरस्काराने गायधनी यांचा सन्मान करण्यात आला आहे.


2.भारतीय संगीतकार विजय पाटील यांचे निधन.राम -लक्ष्मण या नावाने राम म्हणून सुरेंद्र हेंद्र व लक्ष्मण या नावाने विजय पाटील यांना ओळखले जात होते.


3.दहावीची परीक्षा न घेण्याच्या निर्णयावर राज्य सरकार ठाम आहे.उच्च न्यायालयात सुरू असलेल्या दहावीच्या परिक्षबाबतीतील याचिकेवर कोर्टात सुनावणी सुरू आहे.


4.योगगुरू बाबा रामदेव यांना आएएमए ने allopathy विरोधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबाबत कायदेशीर नोटीस पाठवली आहे.


5.आंतरराष्ट्रीय प्रवासाबाबत आर्टिपीसीआर चाचणीच महत्वपूर्ण असल्याचे आरोग्य विभागाने म्हटले आहे.


6.स्पुतनिक या लसीचे भारतात लवकरच उत्पादन सूरु होणार असल्याची माहिती भारताचे रशियातील राजदूत बाल वर्मा यांनी स्पष्ट केले आहे.



7.नेपाळची संसद बरखास्त करण्यात आली आहे.

Saturday, May 22, 2021

*चालू घडामोडी-22मे 2021

 *इतिहासात डोकावताना##

*1906-उडणाऱ्या यंत्राचे (विमान)राईट बंधूनी पेटंट घेतले.

*1961-भारतामध्ये हुंडाबंदी कायदा अमलात आला.

*2015-समलिंगी विवाहला कायदेशीर ठरविणारा आर्यलँड जगातील पहिला देश बनला.

*जन्म-

*1772-समाजसुधारक राजा राममोहन रॉय.

*1871-संस्कृत विद्वान विष्णू वामन बापट

*मृत्यू- 

*1802-अमेरिकेची फर्स्ट लेडी मार्था वॉशिंग्टन यांचे निधन.

*1991-भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक श्रीपाद अमृत डांगे


*चालू घडामोडी-22मे 2021

1.महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी वैद्यकीय परीक्षा सुरक्षित वातावरनात येत्या 10 जूनपासून होणार असल्याचे स्पष्ट केले.


2.रिजर्व बँक ऑफ इंडिया (आरबीआय)च्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये मागील वित्त वर्षांमध्ये 99 हजार 122 कोटी रुपयांचा उपलब्ध झालेला निधी केंद्र सरकारला पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. 


3.सांडू फार्मस्यीत्युकल्स कंपनीचे अध्यक्ष भास्करराव सांडू यांचे वृद्धापकाळाने निधन.


4.पर्यावरण संरक्षण कार्यकर्ते व चिपको आंदोलनाचे प्रणेते 

सुंदरलाल बहुगुणा यांचे कोरोनाने निधन.


5.कोविशिल्ड च्या पहील्या व कोव्याकसीन च्या लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर शरीरात उत्तम प्रकारे अँटिबॉडीज तयार होतात असा निष्कर्ष आयसीएमारने काढला आहे.


6.बंगालच्या उप सगरामध्ये आजपासून 'यास' या नव्या चक्रीवादलावही निर्मिती होणार असल्याची हवामान खात्याने माहिती दिली आहे.


7.देशाचे परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर 24 ते 28 मे दरम्यान अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत .या दौर्यादरम्यान कोरोनाची लस उत्पादन करण्यासाठी लागणाऱ्या कच्चा माल खरेदीबाबत दोन्ही देशांमध्ये चर्चा होणफ आहे.



8.  अमेरिकेमध्ये ऐतिहासिक वर्णद्वेष विरोधी विधेयकास मान्यता देण्यात आली आहे,अमेरिकेतील वर्णद्वेष मुद्दा चांगलाच गाजला होता.



9.चीनने तिबेटच्या ईशान्येकडील भागात महामार्ग बांधण्याचे काम पूर्ण केले आहे.अरुणाचल प्रदेशच्या सीमेजवळ हा महामार्ग आहे.

Thursday, May 20, 2021

*चालू घडामोडी-21 मे 2021

 *इतिहासात डोकावताना##

*1991-राजीव गांधी यांची श्रीपेरबंदूर येथे हत्या करण्यात आली.

*1994-43 व्या जागतिक सौंदर्य स्पर्धेमध्ये भारताची मिस इंडिया सुश्मिता सेन हिने 'मिस युनिव्हर्स 'किताब मिळवला

*जन्म-

*1928-लेखक ज्ञानेश्वर नाडकर्णी.

*1931-हिंदी लेखक ,कवी शरद जोशी

*मृत्यू- 

*1991-राजीव गांधी.


*चालू घडामोडी-21 मे 2021

1.इतर राज्यांमधून   महाराष्ट्र राज्यात येनाऱ्या प्रवाश्यांना आर्टिपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल असणे बंधनकारक करण्यात आले आहे.


2.राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठ व त्यांच्याशी संलग्न 

असणारे अनुदानित महाविद्यालये व संस्थामधील शिक्षकाना सातव्या वेतन आयोगानुसार वाढीव वेतनातील फरकाची रक्कम देण्याचा निर्णय फजय सरकारने घेतला आहे. 


3.नागपूर येथील राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (निरी) कोरोना टेस्ट संदर्भात संशोधन केले आहे ,त्यानुसार आता गुळणीद्वारेही कोरोना चाचणी करता येणार आहे.या संशोधनास आयसीएमारने मान्यता दिली आहे.


4.प्राप्तिकर विवरण भरण्यास 30 सप्टेंबर 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.


5.केरळ राज्याचे सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून पिनाराई विजयन यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.


6.म्युकर मायकोसिस (काळी बुरशी) ला साथरोग जाहीर करण्याची केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्यांना सूचना केली आहे.



7.प्रसिद्ध भारतीय उद्योजक गौतम अडाणी यांच्या अदाणी उद्योग समूहाने  सॉफ्टबँक या जपानी कंपणीच्या भारतातील व्यवसाय 3.5 अब्ज डॉलरला खरेदी केला व यासोबतच अदाणी उद्योग समूह जगातील सर्वात मोठी सौरऊर्जा कंपनी ठरला आहे.




8.  रिजर्व बँकेने घालून दिलेल्या दिशानिर्देश नियमाचे उल्लंघन केल्यामुळे सिटी युनियन बँक ,तमिळनाडू मार्केन्टाईल बँक याना दिड कोटी रुपयांचा दंड करण्यात आला आहे.


9.नाशिक येथील आंतरराष्ट्रीय नेमबाजी प्रशिक्षक मोनाली गोर्हे यांचे निधन.


10.आंतरराष्ट्रीय विमान प्रवास करण्याकरिता कोरोनाच्या चाचणी अहवालावर क्यूआर कोड असणे बंधनकारक करण्यात आले आहे.कोरोना अहवालात फेरफार झाल्याच्या घटना रोखण्यासाठी  22 मेपासून हा नियम लागू करण्यात येणार आहे.


11.2021 च्या तिमाहिमध्ये चीन,भारत,दक्षिण आफ्रिका या विकसनशील देशांची अर्थव्यवस्था कोरोना काळामध्ये देखील उत्तम असल्याचे संयुक्त राष्ट्र संघाने म्हटले आहे.कोरोनाच्या संकटातही विकसनशील देशांचा  जागतिक व्यापार स्तर स्थिर आहे.

चालू घडामोडी 20 मे

 *इतिहासात डोकावताना##


*जन्म-

*1850-ग्रंथकार विष्णुशास्त्री चिपळूणकर.

*1860-नोबल पारितोषिक विजेते जर्मन रसायनशास्त्रज्ञ एदुआर्द बुखनेर.


*मृत्यू-

*1932-भारतीय सस्वातंत्र्यसैनिक बीपीनचंद्र पाल .

*2000-भारतीय उद्योजक एस.पी.गोदरेज.


*चालू घडामोडी-

1.नवीन अविभाज्य शर्थीने दिलेल्या इनाम व वतन (महार वतन व देवस्थान जमीन वगळून)जमिनीवरील अनधिकृत बांधकामे 75 ऐवजी 25 टक्के दंड घेऊन नियमित करण्याचा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला.


2.घरोघरी जाऊन लसीकरण करण्यास मान्यता न देण्याच्या केंद्र सरकारच्या भूमिकेबाबत मुंबई उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे ,तसेच घरोघरी जात लसीकरण करणे जर मुंबई महानगर पालिकेस शक्य असेल तर केंद्र सरकारच्या परवानगीची वाट पाहण्याऐवजी आम्ही परवानगी देऊ अशा शब्दात मुंबई मनपाच्या आयुक्तांना भूमिका स्पष्ट करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत.



3.शिक्षक प्रशिक्षणासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने स्वतंत्र प्रणाली निर्माण करण्याकरिता 30 कोटी रुपयांची निविदा काढलेली आहे.


4.ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांच्या कायम  प्रवास भत्त्यामध्ये 1500  रुपये इतकी वाढ करण्याचा महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे.


5.डॉ.अशोक बेलखोडे याना डॉ.गिरीश गांधी राष्ट्रीय सामाजिक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.आदीवासींच्या आरोग्यावर किनवट येथे डॉ.बेलखेडे काम करत आहेत.



6.कोरोनाची लग्न झालेल्या व्यक्तींना कोरोना मधून बरे झाल्यावर तीन महिन्यानंतर लस देण्यात यावी अशी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्यांना सूचना केली आहे.


7.तोकते वादळामुळे गुजरातमधील नुकसानग्रस्त भागाची हवाई पाहणी केल्यानंतर गुजरातसाठी तातडीने 1 हजार कोटी रुपयांच्या आर्थिक सहाय्यची पंतप्रधान मोदींनी घोषणा केली .


8.  जे.के दत्त यांचे निधन.नॅशनल सेक्युरिटी गार्ड(NSG)चे माजी महासंचालक होते.


9.केंद्र सरकारने प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने मधून कोरोना काळात केंद्रशासित प्रदेश व राज्यांना 31.80 लाख मेट्रिक टन धान्य पाठवण्यात आले आहे.


10.राजस्थान व हरयाणा मध्ये, 'काळी बुरशी' (म्युकर मायकोसिस)महामारी म्हणून जाहीर करण्यात आले आहे.काळ्या बुरशीचे रुग्ण या राज्यांमध्ये वेगाने आढळत आहेत.


11.अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासन कार्यकाळातील एचवन बी व्हिसा साठी पात्र ठरण्याचा नियम रद्दन केल्याची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी केली आहे.


Wednesday, May 19, 2021

19 मे चालू घडामोडी

 *चालू घडामोडी 19 मे

##इतिहासात डोकावताना##


*जन्म-

*1913-नीलम संजीव रेड्डी-भारताचे सहावे राष्ट्रपती

*1926 भारतीय तत्वज्ञ स्वामी क्रीयानंद

*मृत्यू-

*1904-जमशेदजी टाटा -टाटा उद्योग समूहाचे संस्थापक

*1958-भारतीय इतिहासकार सर जदुनाथ सरकार 

*2008-मराठी साहित्यिक विजय तेंडुलकर.


चालू घडामोडी -


1.प्रभावी लसीकरन करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने कोरोना प्रतिबंधक  5 कोटी लसींच्या खरेदीसाठी जागतिक निविदा काढली आहे.


2.जेष्ठ संगीतकार व गायक अच्युत ठाकूर यांचे निधन .



3.देशामध्ये कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या बाबतीत महाराष्ट्र राज्याने 2 कोटी एवढ्या नागरिकांचे लसीकरण केले आहे.एवढ्या मोठ्या प्रमाणत लसीकरण  करणारे महाराष्ट्र देशातील एकमेव राज्य आहे.


4.देशाच्या माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाने व्हाट्सप ला नवीन प्रायव्हसी पॉलिसी मागे घेण्याचे आदेश दिले आहेत.


5.आंतरराष्ट्रीय चित्र प्रदर्शनात पाठवण्यात आलेल्या पारधी जमतीतील चित्रकर्तीच्या 8 लाखांच्या कलाकृती राज्याच्या आदिवासी विभागाकडून गहाळ झाल्या आहेत.



6.कोरोनाच्या दुसऱ्या लाटीचा मागणी व रोजगाराला गंभीर फटका बसल्याचे रिजर्व बँकेने मे 2021 साठी जरी केलेल्या आर्थिक बुलेटिन मध्ये म्हटले आहे.


7.आएएमए चे माजी अध्यक्ष माजी अध्यक्ष व प्रसिध्द हृदयरोग तज्ञ डॉ .के.के. अग्रवाल यांचे कोरोनाने निधन झाले.








18 मे चालू घडामोडी

 *चालू घडामोडी -18 मे 2021

##इतिहासात डोकावताना###

*1969-अमेरिकेचे अपोलो 10 चे प्रक्षेपण.

1974-भारताने पोखरण येथे यशस्वी रित्या परमाणू चाचणी केली,यासोबतच परमाणू शक्ती असणारा भारत सहावा देश ठरला.


*जन्म-

*1682-मराठा साम्राज्याचे पाचवे छत्रपती शाहूराजे भोसले.

*मृत्यू-

*1846-बाळशास्त्री जांभेकर-मराठी वृत्तपत्र जनक.

*1997-पहिल्या भारतीय चित्रपट क्षेत्रातील महिला कलाकार कमलाबाई गोखले.




चालू घडामोडी -18 मे 2021


1.ONGC चे मालवाहतूक करणारे जहाज समुद्रामध्ये बुडाले ,तोकते वादळाचा परिणाम.260 जहाजावरील लोकांपैकी 147 लोकांना वाचवण्यात यश.


2.दिल्ली चे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली सरकार कोरोना परिस्थितीत अनाथ मुलाना 2500 रुपये दरमहा पेन्शन देणार असल्याचे घोषणा केली.



3.कोरोना प्रतिबंधक लस घेतल्याने रक्ताच्या गुठळ्या होण्याचे भारतातील प्रमाण कमी असल्याचे लसीकरणा नंतरच्या दुसपरिणामांचा अभ्यास करणाऱ्या राष्ट्रीय समितीने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला अहवाल दिला आहे.


4'इनसाकोग' या जनुकीय कर्मनिर्धारण करणाऱ्या संस्थेच्या प्रमुखपदाचा प्रसिद्ध विषाणूतज्ञ डॉ.शाहिद जमिल यांनी राजीनामा दिला आहे.



5.भारतीय नौदलाने तोकते वादळाच्या प्रभावात भारतीय नौदल व तटरक्षक दलाने मुंबईच्या समुद्रात भरकटलेल्या 4 बार्ज वरील कर्मचाऱ्यांना वाचवण्यासाठी बचावकार्य सुरू केले आहे.



6.मालवाहतुकीमध्ये देशातील 12 बंदरांमध्ये महाराष्ट्रातील जेएनपीटी बंदर अववल ठरले आहे.


7.भारतीय संघाचा माजी सलामीवीर फलंदाज शिवसुंदर दास ची भारतीय महिला क्रिकेट संघाच्या फलंदाजी प्रशिक्षक पदी नियुक्ती.


8.मेक्सिको ची अंद्रिया मेझा ही 2020 ची विश्वसुंदरी ठरली आहे.या स्पर्धेमध्ये मिस इंडिया बनलेली भारताची एडलाईन कॅस्टॅलिनो चौथ्या क्रमांकावर आली.विश्वसुंदरी 2020 ही स्पर्धा कोरोनामुळे 2021 मध्ये घेण्यात आली.

चालू घडामोडी 17 मे

 इतिहासात डोकावताना###

*जन्म-

*1749-डॉ.एडवर्ड जेंनार-देवी या रोगावरील लस शोधन करणारे संशोधक.

*1865-इतिहासकार गोविंद सरदेसाई


*मृत्यू-

*1972-शिल्पकार रघुनाथ फडके.


चालू घडामोडी -१७मे


1.तौक्ते वादळाचा धोका असणाऱ्या राज्यांनि कोरोना रुग्णाची विशेष काळजी घ्यावी, दवाखान्याच्या विद्युत पुरवठा इत्यादी बाबी कडे लक्ष देण्याच्या सूचना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उच्चस्तरीय बैठकीत केल्या.यासोबतच गृहमंत्रालयत केंद्रीय नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.


2.केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ग्रामीण ,निमशहरी,आदिवासी भागासाठी कोरोना प्रतिबंधक उपचारांसाठी नवी नियमावली जरी केली आहे.यानुसार ग्रामीण आरोग्य समिती,व आशा सेविका द्वारे फ्लू सदृश्य ,श्वसनविकार सदृश्य रुग्णाचा शोध घेतला जाणार आहे.



3.केंद्रीय आरोग्य विभागाने जरी केलेल्या माहितीनुसार राज्यांना पुढील तीन दिवसांमध्ये 51 लाख लस देण्यात येणार आहे.


4.जेष्ठ संवादिनी ,ऑर्गन वादक मधुसूदन बोपरडीकर यांचे निधन.



5.केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोविशिल्ड लसीच्या दोन डोस मधील अंतर 84 दिवस केले आहे.


6.काँग्रेसचे राज्यसभा खासदार राजीव सातव यांचे निधन.


7.मालवाहतुकीमध्ये देशातील 12 बंदरांमध्ये महाराष्ट्रातील जेएनपीटी बंदर अववल ठरले आहे.


8.स्पुतनिक व्ही या रशियन लसीचा 60 हजार डोस असणारा दुसरा साठा भारतात दाखल झाला आहे.


9.स्वस्त धान्य दुकाने दीर्घकाळ उघडे ठेवण्याचे केंद्र सरकारचे राज्य सरकारला सूचना.


10.इटालियन ओपन टेनिस स्पर्धा 2021 च्या अंतिम लढतीत नोवाक जोकोविचला नमवत राफेल नदाल बनला विजेता.