Thursday, May 20, 2021

*चालू घडामोडी-21 मे 2021

 *इतिहासात डोकावताना##

*1991-राजीव गांधी यांची श्रीपेरबंदूर येथे हत्या करण्यात आली.

*1994-43 व्या जागतिक सौंदर्य स्पर्धेमध्ये भारताची मिस इंडिया सुश्मिता सेन हिने 'मिस युनिव्हर्स 'किताब मिळवला

*जन्म-

*1928-लेखक ज्ञानेश्वर नाडकर्णी.

*1931-हिंदी लेखक ,कवी शरद जोशी

*मृत्यू- 

*1991-राजीव गांधी.


*चालू घडामोडी-21 मे 2021

1.इतर राज्यांमधून   महाराष्ट्र राज्यात येनाऱ्या प्रवाश्यांना आर्टिपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल असणे बंधनकारक करण्यात आले आहे.


2.राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठ व त्यांच्याशी संलग्न 

असणारे अनुदानित महाविद्यालये व संस्थामधील शिक्षकाना सातव्या वेतन आयोगानुसार वाढीव वेतनातील फरकाची रक्कम देण्याचा निर्णय फजय सरकारने घेतला आहे. 


3.नागपूर येथील राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (निरी) कोरोना टेस्ट संदर्भात संशोधन केले आहे ,त्यानुसार आता गुळणीद्वारेही कोरोना चाचणी करता येणार आहे.या संशोधनास आयसीएमारने मान्यता दिली आहे.


4.प्राप्तिकर विवरण भरण्यास 30 सप्टेंबर 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.


5.केरळ राज्याचे सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून पिनाराई विजयन यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.


6.म्युकर मायकोसिस (काळी बुरशी) ला साथरोग जाहीर करण्याची केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्यांना सूचना केली आहे.



7.प्रसिद्ध भारतीय उद्योजक गौतम अडाणी यांच्या अदाणी उद्योग समूहाने  सॉफ्टबँक या जपानी कंपणीच्या भारतातील व्यवसाय 3.5 अब्ज डॉलरला खरेदी केला व यासोबतच अदाणी उद्योग समूह जगातील सर्वात मोठी सौरऊर्जा कंपनी ठरला आहे.




8.  रिजर्व बँकेने घालून दिलेल्या दिशानिर्देश नियमाचे उल्लंघन केल्यामुळे सिटी युनियन बँक ,तमिळनाडू मार्केन्टाईल बँक याना दिड कोटी रुपयांचा दंड करण्यात आला आहे.


9.नाशिक येथील आंतरराष्ट्रीय नेमबाजी प्रशिक्षक मोनाली गोर्हे यांचे निधन.


10.आंतरराष्ट्रीय विमान प्रवास करण्याकरिता कोरोनाच्या चाचणी अहवालावर क्यूआर कोड असणे बंधनकारक करण्यात आले आहे.कोरोना अहवालात फेरफार झाल्याच्या घटना रोखण्यासाठी  22 मेपासून हा नियम लागू करण्यात येणार आहे.


11.2021 च्या तिमाहिमध्ये चीन,भारत,दक्षिण आफ्रिका या विकसनशील देशांची अर्थव्यवस्था कोरोना काळामध्ये देखील उत्तम असल्याचे संयुक्त राष्ट्र संघाने म्हटले आहे.कोरोनाच्या संकटातही विकसनशील देशांचा  जागतिक व्यापार स्तर स्थिर आहे.

No comments:

Post a Comment