Wednesday, May 19, 2021

18 मे चालू घडामोडी

 *चालू घडामोडी -18 मे 2021

##इतिहासात डोकावताना###

*1969-अमेरिकेचे अपोलो 10 चे प्रक्षेपण.

1974-भारताने पोखरण येथे यशस्वी रित्या परमाणू चाचणी केली,यासोबतच परमाणू शक्ती असणारा भारत सहावा देश ठरला.


*जन्म-

*1682-मराठा साम्राज्याचे पाचवे छत्रपती शाहूराजे भोसले.

*मृत्यू-

*1846-बाळशास्त्री जांभेकर-मराठी वृत्तपत्र जनक.

*1997-पहिल्या भारतीय चित्रपट क्षेत्रातील महिला कलाकार कमलाबाई गोखले.




चालू घडामोडी -18 मे 2021


1.ONGC चे मालवाहतूक करणारे जहाज समुद्रामध्ये बुडाले ,तोकते वादळाचा परिणाम.260 जहाजावरील लोकांपैकी 147 लोकांना वाचवण्यात यश.


2.दिल्ली चे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली सरकार कोरोना परिस्थितीत अनाथ मुलाना 2500 रुपये दरमहा पेन्शन देणार असल्याचे घोषणा केली.



3.कोरोना प्रतिबंधक लस घेतल्याने रक्ताच्या गुठळ्या होण्याचे भारतातील प्रमाण कमी असल्याचे लसीकरणा नंतरच्या दुसपरिणामांचा अभ्यास करणाऱ्या राष्ट्रीय समितीने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला अहवाल दिला आहे.


4'इनसाकोग' या जनुकीय कर्मनिर्धारण करणाऱ्या संस्थेच्या प्रमुखपदाचा प्रसिद्ध विषाणूतज्ञ डॉ.शाहिद जमिल यांनी राजीनामा दिला आहे.



5.भारतीय नौदलाने तोकते वादळाच्या प्रभावात भारतीय नौदल व तटरक्षक दलाने मुंबईच्या समुद्रात भरकटलेल्या 4 बार्ज वरील कर्मचाऱ्यांना वाचवण्यासाठी बचावकार्य सुरू केले आहे.



6.मालवाहतुकीमध्ये देशातील 12 बंदरांमध्ये महाराष्ट्रातील जेएनपीटी बंदर अववल ठरले आहे.


7.भारतीय संघाचा माजी सलामीवीर फलंदाज शिवसुंदर दास ची भारतीय महिला क्रिकेट संघाच्या फलंदाजी प्रशिक्षक पदी नियुक्ती.


8.मेक्सिको ची अंद्रिया मेझा ही 2020 ची विश्वसुंदरी ठरली आहे.या स्पर्धेमध्ये मिस इंडिया बनलेली भारताची एडलाईन कॅस्टॅलिनो चौथ्या क्रमांकावर आली.विश्वसुंदरी 2020 ही स्पर्धा कोरोनामुळे 2021 मध्ये घेण्यात आली.

No comments:

Post a Comment