Wednesday, May 19, 2021

चालू घडामोडी 17 मे

 इतिहासात डोकावताना###

*जन्म-

*1749-डॉ.एडवर्ड जेंनार-देवी या रोगावरील लस शोधन करणारे संशोधक.

*1865-इतिहासकार गोविंद सरदेसाई


*मृत्यू-

*1972-शिल्पकार रघुनाथ फडके.


चालू घडामोडी -१७मे


1.तौक्ते वादळाचा धोका असणाऱ्या राज्यांनि कोरोना रुग्णाची विशेष काळजी घ्यावी, दवाखान्याच्या विद्युत पुरवठा इत्यादी बाबी कडे लक्ष देण्याच्या सूचना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उच्चस्तरीय बैठकीत केल्या.यासोबतच गृहमंत्रालयत केंद्रीय नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.


2.केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ग्रामीण ,निमशहरी,आदिवासी भागासाठी कोरोना प्रतिबंधक उपचारांसाठी नवी नियमावली जरी केली आहे.यानुसार ग्रामीण आरोग्य समिती,व आशा सेविका द्वारे फ्लू सदृश्य ,श्वसनविकार सदृश्य रुग्णाचा शोध घेतला जाणार आहे.



3.केंद्रीय आरोग्य विभागाने जरी केलेल्या माहितीनुसार राज्यांना पुढील तीन दिवसांमध्ये 51 लाख लस देण्यात येणार आहे.


4.जेष्ठ संवादिनी ,ऑर्गन वादक मधुसूदन बोपरडीकर यांचे निधन.



5.केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोविशिल्ड लसीच्या दोन डोस मधील अंतर 84 दिवस केले आहे.


6.काँग्रेसचे राज्यसभा खासदार राजीव सातव यांचे निधन.


7.मालवाहतुकीमध्ये देशातील 12 बंदरांमध्ये महाराष्ट्रातील जेएनपीटी बंदर अववल ठरले आहे.


8.स्पुतनिक व्ही या रशियन लसीचा 60 हजार डोस असणारा दुसरा साठा भारतात दाखल झाला आहे.


9.स्वस्त धान्य दुकाने दीर्घकाळ उघडे ठेवण्याचे केंद्र सरकारचे राज्य सरकारला सूचना.


10.इटालियन ओपन टेनिस स्पर्धा 2021 च्या अंतिम लढतीत नोवाक जोकोविचला नमवत राफेल नदाल बनला विजेता.


No comments:

Post a Comment