**इतिहासात डोकावताना**
*1986-युरोपमधील सर्व देशांनी युरोपिअन संघाचा धवज स्वीकारला.
*1999-भारत व पाकिस्तान दरम्यान कारगिल युद्धास सुरुवात.
*जन्म-
*1938-प्रसिद्ध मराठी कादंबरीकार भालचंद्र नेमाडे
*1962-भारतीय क्रिकेटर देवी शास्त्री
*मृत्यू-
*1935-रमाबाई भीमराव आंबेडकर
*1964-भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू.
*चालू घडामोडी-27मे 2021
1.राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजने अंतर्गत केशरी शिधापत्रिका धारकांना जुनमध्येही सवलतीच्या दरात अन्न धान्याचा पुरवठा होणार आहे.
2.सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये पहिल्यांदाच गिफ्रॉन या गिधाडांच्या प्रजातीची नोंद करण्यात आली आहे .हा पक्षी तिबेट,पाकिस्तान,भूतान,नेपाळ,चीन,युरोप, मध्ये मुख्यत्वे आढळतो.
3.जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक एच एस दोरायस्वामी यांचे निधन,भारत छोडो आंदोलनात त्यांचा सहभाग होता.
4.3 जुलै ला होणारी jee एडवांस परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.
5.महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम 1981 नुसार 1 जून ते 31 जुलै दरम्यान मासेमारी बंद ठेवण्याचे आदेश मत्स्य व्यवसाय विभागाने दिले आहेत.
6.केंद्राने जारी केलेल्या माहिती तंत्रज्ञान विषयक नव्या नियमाच्या विरोधात व्हाट्सप ने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखलबकेली आहे.
7.अमेझॉन या इ टेल कम्पनी ने चित्रपट निर्मिती करणारी मेट्रो गोल्डविन मेयर ही कम्पनी विकत घेतली आहे.8.45अब्ज डॉलरचा हा व्यवहार आहे.
8.आयसीसीने जारी केलेल्या वनडे रँकिंगमध्ये फलंदाजी क्रमवारीत विराट कोहली व रोहित शर्मा अनुक्रमे द्वितीय व तृतीय स्थानी आहेत.गोलंदाजीमध्ये जसप्रीत बुमराह पाचव्या स्थानी आहे.
9.अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन व रशियाचे अध्यक्ष ब्लादमीर पुतीन यांच्यात जूनमध्ये जीनेव्हा येथे 16 जुनला बैठक होणार आहे.दोन्ही देशातील संबंध सुधारण्याच्या दृष्टीने ही महत्वाची बैठक असेल.
No comments:
Post a Comment