**इतिहासात डोकावताना**
*1986-युरोपमधील सर्व देशांनी युरोपिअन संघाचा धवज स्वीकारला.
*1999-भारत व पाकिस्तान दरम्यान कारगिल युद्धास सुरुवात.
*जन्म-
*1885-राम गणेश गडकरी-मराठी नाटककार
*1906-भारतीय कृषी संशोधक-बेंजामिन पाल
*चालू घडामोडी-26मे 2021
1.सर्वोच्च न्यायालयातील चालू खटल्याच्या पार्श्वभूमीवर शासकीय नोकरभरतीमध्ये प्रभावित झालेल्या मराठा उमेदवारांना न्याय देण्यासाठी पुढच्या आठवड्यात मंत्रिमंडळ बैठकीत हा प्रस्ताव मांडण्यात येणार आहे.
2.सरासरीपेक्षा जास्त पोझीटीव्हीटी रेट
जास्त असलेल्या 18 जिल्ह्यामध्ये गृह विलगिकर्ण ऐवजी कोरोना रुग्णांना कोविड सेंटरमध्ये रहेवण्यावर भर देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला.
3.सीबीआय च्या संचालक पदी सुबोध कुमार जयस्वाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
4.महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी)ने पीएसआय (पोलीस उपनिरीक्षक) पदाच्या भरती संदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. पीएसआय पदाची मुलाखत देण्यासाठी शारीरिक क्षमता चाचणीत 60 टक्के गन मिळवणे आवश्यक आहे.
5.प्रसिद्ध तमाशा कलाकार कांताबाई सातारकर यांचे निधन.तमाशातील वग सम्राग्नी अशी त्यांची ओळख होती.
6.राज्यातील जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या प्रशासकीय जिल्हातर्गत व आंतरजिल्हा बदल्या ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.
7.भारतातील लसीकरणास चालना देण्यासाठी फायझर या अमेरिकेच्या कोरोना प्रतिबंधक लस उत्पादक कंपनीने 2021 मध्ये भारताला 5 कोटी लसीचे डोस उपलब्ध करून देण्याची तयारी दाखवली आहे.
8.हायब्रिड तांदळाचे जनक म्हणून ओळखले जाणारे चीनचे प्रसिद्ध कृषी संशोधक युआन लॉंगपिंग यांचे निधन.
9.भारताचा ऑलिम्पिक पदक विजेता मल्ल सुशीलकुमार याला सेवेतून निलंबित करण्याचे उत्तर रेल्वेने आदेश जरी केला आहे.कुस्तीपटू सागर धनकारच्या खुनाचा आरोप सुशीलकुमार वर ठेवण्यात आला आहे.
10.जपानमधील वाढत्या कोरोना रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर अमेरिकन नागरिकांनी जपानमध्ये प्रवास करू नये असा अमेरिकन नागरिकांना अमेरिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी दिला आहे.
No comments:
Post a Comment