*इतिहासात डोकावताना##
*जन्म-
*1850-ग्रंथकार विष्णुशास्त्री चिपळूणकर.
*1860-नोबल पारितोषिक विजेते जर्मन रसायनशास्त्रज्ञ एदुआर्द बुखनेर.
*मृत्यू-
*1932-भारतीय सस्वातंत्र्यसैनिक बीपीनचंद्र पाल .
*2000-भारतीय उद्योजक एस.पी.गोदरेज.
*चालू घडामोडी-
1.नवीन अविभाज्य शर्थीने दिलेल्या इनाम व वतन (महार वतन व देवस्थान जमीन वगळून)जमिनीवरील अनधिकृत बांधकामे 75 ऐवजी 25 टक्के दंड घेऊन नियमित करण्याचा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला.
2.घरोघरी जाऊन लसीकरण करण्यास मान्यता न देण्याच्या केंद्र सरकारच्या भूमिकेबाबत मुंबई उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे ,तसेच घरोघरी जात लसीकरण करणे जर मुंबई महानगर पालिकेस शक्य असेल तर केंद्र सरकारच्या परवानगीची वाट पाहण्याऐवजी आम्ही परवानगी देऊ अशा शब्दात मुंबई मनपाच्या आयुक्तांना भूमिका स्पष्ट करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत.
3.शिक्षक प्रशिक्षणासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने स्वतंत्र प्रणाली निर्माण करण्याकरिता 30 कोटी रुपयांची निविदा काढलेली आहे.
4.ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांच्या कायम प्रवास भत्त्यामध्ये 1500 रुपये इतकी वाढ करण्याचा महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे.
5.डॉ.अशोक बेलखोडे याना डॉ.गिरीश गांधी राष्ट्रीय सामाजिक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.आदीवासींच्या आरोग्यावर किनवट येथे डॉ.बेलखेडे काम करत आहेत.
6.कोरोनाची लग्न झालेल्या व्यक्तींना कोरोना मधून बरे झाल्यावर तीन महिन्यानंतर लस देण्यात यावी अशी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्यांना सूचना केली आहे.
7.तोकते वादळामुळे गुजरातमधील नुकसानग्रस्त भागाची हवाई पाहणी केल्यानंतर गुजरातसाठी तातडीने 1 हजार कोटी रुपयांच्या आर्थिक सहाय्यची पंतप्रधान मोदींनी घोषणा केली .
8. जे.के दत्त यांचे निधन.नॅशनल सेक्युरिटी गार्ड(NSG)चे माजी महासंचालक होते.
9.केंद्र सरकारने प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने मधून कोरोना काळात केंद्रशासित प्रदेश व राज्यांना 31.80 लाख मेट्रिक टन धान्य पाठवण्यात आले आहे.
10.राजस्थान व हरयाणा मध्ये, 'काळी बुरशी' (म्युकर मायकोसिस)महामारी म्हणून जाहीर करण्यात आले आहे.काळ्या बुरशीचे रुग्ण या राज्यांमध्ये वेगाने आढळत आहेत.
11.अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासन कार्यकाळातील एचवन बी व्हिसा साठी पात्र ठरण्याचा नियम रद्दन केल्याची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी केली आहे.
No comments:
Post a Comment