1.राष्ट्रीय विज्ञान दिन .भारतीय भौतिक शास्त्रज्ञ चंद्रशेखर व्यंकट रमण यांनि 28 फेब्रुवारी 1928 रोजी रमण प्रभाव या नावाचा सिद्धांत मांडला.त्यांच्या या शोधासाठी त्यांना नोबल परितोषकाने 1928 मध्ये सन्मानित करण्यात आले.नोबल पारितोषिक मिळवणारे सी.वि.रमण हे आशिया खंडामधील पहिली व्यक्ती आहेत.
2.आंतरराष्ट्रीय हवाई वाहतुकीवरील स्थगिती 31 मार्च पर्यंत वाढवण्यात आली आहे.वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरी उड्डाण संचनाल्याने हा निर्णय घेतला आहे.
3.NSE (नॅशनल स्टॉक एक्सचेंज)ने आपल्या तंत्रज्ञान सुविधांमध्ये 900 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे .
4.आता कोरोनाची लस खाजगी रुग्णालयात पण घेता येणार आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्राने कोरोना लसीची किंमत ठरून दिली आहे. त्यानुसार 250 रुपयांमध्ये लस उपलब्ध असेल.
5.पुण्याच्या गहुजे स्टेडियमवर भारत वि इंग्लंड या संघा दरम्यान होणाऱ्या एकदिवसीय सामन्याचा मार्ग मोकळा झाला आहे .महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने सामने होण्यास परवानगी दिली आहे मात्र या सामन्यास प्रेक्षकांना परवानगी नाकारण्यात आली आहे.
6.डॉ.प्रशांत कुमार पाटील यांची राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कुलगुरू पदी नियुक्ती करण्यात आली आहे.यापूर्वी पाटील हे मुंबईच्या केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे संचालक म्हणून कार्यरत आहेत.
7.महाराष्ट्र राज्य जलसंपदा विभाग धरनांच्या दुरुस्तीसाठी 624कोटी रुपये खर्च करणार आहे.
राज्याच्या जलसंपदा विभागाने हा निर्णय घेतला आहे.या योजनेतील 70 टक्के रक्कम हे जागतिक बँकेद्वारे तरतूद करण्यात आली आहे.
8.पुस्तकांचं गाव ही संकल्पना सत्यात उतरवत पुढील वर्षापर्यंत महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात एक पुस्तकाच गाव तयार करण्यात येईल अशी घोषणा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठी राजभाषा दिनी केली.
*संपर्क -sankalponline0@gmail.com
*संकल्प डिजिटल फोटोझ &मल्टी सर्विसेस
##Folow us on facebook,telegram&instagram@sankalponlineworks


































