आज 25 फेब्रुवारी
1. प्रदीप भोसले यांनी साकारलेल्या मोजेक प्रकारातील पोट्रेट ची गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झाली आहे. जैन इरिगेशन चे संस्थापक भवरलाल जैन यांचे ते पोट्रेट आहे, हे पोट्रेट जैन पाईपसचा वापर करून बनवले आहे.
18 हजार 64 फूट एरियात ही कलाकृती साकारली आहे.
2.तांत्रिक बिघाडामुळे शेअर बाजार 5 वाजेपर्यंत सुरू होता.नियोजित वेळ नंतरही शेअर बाजाराचे कामकाज चालू होते.शेअर बाजार पहिल्यांदाच असा 5 वाजेपर्यंत सुरू होता.
3.महाराष्ट्र राज्यातील सर्वात वयाने व अनुभवाने जेष्ठ सनदी अधिकारी असणारे भुजंगराव कुलकर्णी यांच वृद्धापकाळमुळे निधन झाले.राज्याच्या जडणघडनिचे ते साक्षिदार होते.
4.1 मार्चपासून देशातील 60 वर्षांपुढील सर्वांचे लसीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महत्वाचा निर्णय आहे.
5.1 लाख 32 हजार आसन क्षमता असणारे जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम भारताच्या अहमदाबाद येथे बनवण्यात आले आहे .भारत वि इंग्लंड या दोन संघमध्ये कसोटी सामने या मैदानावर खेळवण्यात येत आहेत.राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते याचे उद्घाटन झाले .देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव या स्टेडियम ला देण्यात आले.
6.पालघर हत्याकांड प्रकरणी महाराष्ट्र सरकारला नवे आरोपपत्र दाखल करण्याचा सुप्रीम कोर्टाने आदेश दिला आहे.
7.महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालकानी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कार्यालयीन पोलिस कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमच्या सूचना दिल्या आहेत.




No comments:
Post a Comment