*राष्ट्रीय-
1.संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामधील बिबट्याला रेडिओ कॉलर बसवण्यात आले आहे.या कॉलेरमुळे बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवता येणार आहे.जंगली प्राणी व मानव संघर्ष याचा अभ्यास करण्यास याची मदत होणार आहे.कॉलर बसवण्यात आलेल्या बिबट्या मादीचे नाव 'सावित्री 'असे आहे.
2.'चांद्र यान-3' मोहीम आता पुढील वर्षी ढकलण्यात आली आहे.कोरोनामुळे ही मोहीम आता 2022 मध्ये पूर्ण होण्याची शक्यता आहे.
3.सोशल मिडियावर्ती नियंत्रण ठेवण्यासाठी कायद्याच्या चौकटीत बसेल असा नवीन कायदा करण्याच्या तयारीत केंद्र सरकार असल्याचे भाजपचे सरचिटणीस राम माधव म्हणाले.
4. वस्तू व सेवा कर अर्थात GST कराचा 17 व हप्ता केंद्र सरकारकडून राज्य सरकारांना वाटप करण्यात आला आहे.5000 कोटी रुपयांची ही एकूण GSTभरपाई केंद्राकडून राज्यांना देण्यात आली आहे.
5.भारतात कोरोनाच्या 7569 उतपरिवर्तीत प्रकार आढळून आले आहे तसेच त्याचे विश्लेषण करण्यात भारतीय शास्त्रज्ञांना यश आले आहे.
6.चंदिगढ येथे झालेल्या 55व्या राष्ट्रीय क्रॉस कंट्री अथलेटिक्स या स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलांच्या व मुलींच्या संघांनी 20 वर्षांखालील सांघिक गटाचे विजेतेपद पटकावले आहे.
*आंतरराष्ट्रीय-
1.औस्ट्रेलिअन ओपन टेनिस पुरुष एकेरी स्पर्धेत दानील मेददेवचा पराभव करत नोवाक जोकोविचने नवव्या वेळेस विजेतेपदाचा मान मिळवला.
2.स्वप्न पाहत असणाऱ्या व्यक्तीशी संवाद साधण्यात शास्त्रन्यांना यश आले आहे.इलेक्टरोफिजिओलॉजीकल सिग्नलद्वारे स्वप्न पाहत असणारी व्यक्ती उत्तरे देऊ शकते.या प्रयोगाबद्दल सायन्स डायरेक्ट या नियतकालिकात लेख प्रसिद्ध करण्यात आला आहे.
3.अँप बाजारामधील चीनची हिस्सेदारी घटली आहे .apsflyer या संस्थेच्या सर्वेनुसार 2019 मध्ये अँप बाजारात चीनची 38 टक्के हिस्सेदारी होती तीच 2020 मध्ये 29 टक्के झाली आहे.भारतीय अँप बाजारातील हिस्सेदारी ही 39 टक्के इतकी झाली आहे.





No comments:
Post a Comment