Friday, February 26, 2021

चालू घडामोडी 26.02.2021


आज वीर सावरकर यांची जयंती.



 1.आता खासगी बँकांना सरकारी व्यवसाय करता येणार आहे.केंद्र सरकारने खाजगी बँकांवरील सरकारी व्यवसाय करण्याची बंधने हटवली आहेत.आता कर संकलन निवृत्ती वेतन ,अडायगी या सारख्या सरकारी व्यवसायात सर्व खाजगी बँका सहभागी होऊ शकतील.



2.केंद्र सरकारने Ott platform ,सोशल मीडिया व न्यूज पोर्टलवर निर्बंध लागू केले आहेत.न्यायालय व केंद्र सरकारने माहिती मागितल्यास द्यावी लागणार.



3.आता महारराष्ट्रामध्ये ग्रामीण क्षेत्रामध्ये 3200 चौ.फुटांवर बांधकामास नगर रचनाकारच्या परवानगीची गरज लागणार नाही.महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी ही घोषणा केली आहे. 



4.उच्च न्यायालयातील 22 न्यायमूर्तीच्या निवडीचा प्रस्ताव वादात सापडला आहे.18 वकील व 4 न्यायिक अधिकाऱ्यांच्या मुंबई उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती म्हणून निवडीबाबत हा प्रस्ताव आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीनि या यादीला आक्षेप घेतला आहे.



5.भारत वि इंग्लंड यांचया दरम्यान सुरू असलेल्या गुलाबी चेंडूवरील कसोटी सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडच्या संघास पराभूत केले आहे. भारतीय संघाने 2-1 ने आघाडी घेतली आहे.



6.गूगल चे अनुकरण करत फेसबुक करणार 1 अब्ज डॉलरची गुंतवणूक .फेसबुक वापर्कत्यांना ताज्या बातम्या भेटण्यासाठी फेसबुक येत्या तीन वर्षात ही गुंतवणूक करणार आहे.






No comments:

Post a Comment