Friday, December 31, 2021

प्रधानमंत्री ग्रामीण डिजिटल साक्षरता अभियान योजना मिळेल मोफत कॉम्प्युटर कोर्स सर्टिफिकेट !

* प्रधानमंत्री ग्रामीण डीजिटल साक्षरता अभियान 



*PMGDISHA योजना  


*काय आहे PMGDISHA योजना ?

         तर मित्रानो आज आपण जाणून घेणार आहोत प्रधानमंत्री ग्रामीण डिजिटल साक्षरता अभियान PMGDISHA या योजनेविषयी .मित्रानो गांधीजी म्हणायचे खेड्याकडे चला अर्थात राष्ट्रपिता महात्मा गांधीजींना कळून चुकले असावे कि जर भारताला  विकास साधायचा असेल तर खेडे विकसित होणे आत्मनिर्भर बनणे अत्यंत आवश्यक आहे .२०२० च्या आकडेवारीनुसार जवळपास आपल्या भारत देशातील ६५ टक्के इतकी लोकसंख्या हि खेड्यामध्ये राहते .खेड्यामध्ये राहणाऱ्या या मोठ्या लोकसंखेत पूर्वी साक्षरतेचा अभव दिसून येत होता ,सरकारने केलेल्या विविध योजनांचे स्वरूप म्हणून हे चित्र आता पालटू लागले आहे .सध्याच्या  या डिजिटल युगात मात्र केवळ साक्षर असून जमत नाही तर प्रत्येक व्यक्ती हि डिजिटल साक्षर असायला हवी तिला संगणकाचे मुलभूत ज्ञान असणे आवश्यक आहे .केंद्र सरकारच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाद्वारे याच दृष्टीकोनातून PMGDISHA हि योजना राबवण्यात येते .या योजनेचे उद्दिष्ट हे ग्रामीण जनतेस डिजिटल साक्षर बनवणे व त्यांचे जीवन आणखीन सुखकर बनवणे  आहे .

                                 



*PMGDISHA योजनेचे उद्दिष्ट्ये -

*ग्रामीण भागातील नागरिकांना संगणक किवा डिजिटल एक्सेस उपकरणे (जसे कि स्मार्ट  फोन,संगणक ,ल्यापटप ,)चालविण्याचे प्रशिक्षण देऊन सकाशम करणे ,इमेल पाठवणे आणि प्राप्त करणे ,इंटरनेट ब्राउज करणे ,सरकारी सेवांमध्ये प्रवेश करणे ,माहिती शोधणे हे या योजनेचे वैशिष्ट्य आहे . 


PMGDISHA योजनेचे फायदे -

*ग्रामीण भागामध्ये खेड्यामध्ये राहणाऱ्या व्यक्तीस कॉम्प्युटर चालवणे ,डिजिटल उपकरणे चालवणे शिकणे ,मोफत व सहजरीत्या उपलब्ध होत आहे यासोबतच कॉम्प्युटर कोर्सचे मोफत सर्टिफिकेट देखील मिळणार आहे . .



या योजनेकरिता आवश्यक पात्रता -

या योजनेचा लाभ घेण्याकरिता व्यक्तीचे वय हे १४ ते ६० वर्षांच्या दरम्यान असायला हवे . .

कुठे करता येणार याची नोंदणी


PMGDISHA  नोंदणी करण्याकरिता तुम्हाला तुमच्या परिसरातील सरकारच्या अधिकृत CSC (Customer Service Point ) केंद्रात नोंदणी करता  येणार आहे 


*आवश्यक कागदपत्रे -

आधार कार्ड ,मोबाईल नंबर ,इमेल आयडी 




Thursday, December 30, 2021

ई- श्रम कार्ड योजना असंघटित कामगारांसाठी सर्वात मोठी योजना! मिळेल 200000चे विमा संरक्षण!

 ई- श्रम कार्ड योजना 


 



 ई -श्रम कार्ड योजना .भारत देशामधील सर्व असंघटीत कामगारांसाठी एक महत्वाची गोष्ट.केंद्र सरकारच्या श्रम व रोजगार मंत्रालयाने  देशातील असंघटीत कामगारांसाठी ई श्रम कार्ड हि योजना सुरु केली आहे.या योजने अंतर्गत असंघटीत क्षेत्रातील सर्व कामगारांना एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले जात आहे त्यांची एक विशिष्ट प्रकारची नोंद ठेवण्यात येत आहे .या योजने अंतर्गत विविध क्षेत्रातील कामगारांना विविध लाभ मिळणार आहेत  तर काय आहे हि योजना व कोण कोण याचा लाभ घेऊ शकते जाणून घेऊयात संविस्तर पणे .


*ई -श्रम कार्ड योजना -



ई श्रम कार्ड या योजनेद्वारे भेटणाऱ्या माहितीचा वापर असंघटीत कामगारांच्या हितासाठी च्या योजना राबवण्यासाठी करण्यात येणार आहे .याद्वारे असंघटीत कामगारांची नोंद ठेवण्यास सरकारला मदत होणार आहे .कामगार व त्यांच्या कुटुंबासाठी कल्याण करी योजना राबवण्यात येणार आहेत .


* ई- श्रम कार्ड कोणत्या व्यक्ती बनवू शकतात ?

१.घर काम करणाऱ्या महिला 

२.लहान आणि श्रीमंत शेतकरी 

३.रस्त्यावरील विक्रेते 

४.दुध व्यवसाय करणारे शेतकरी 

५.रिक्षा चालक 

६.वृत्त पत्र विक्रेते 

७.पशुपालन करणारे कामगार 

८.शिलाई मशीन कामगार 

९.रस्ते कामगार 

१०.सुतारकाम करणारे कामगार 

११.शेत मजूर 

१२.आशा सेविका 

१३.न्हावी कामगार 

१४.बांधकाम करणारे कामगार 

१५.ब्युटी पार्लर कामगार 

१६.पेंटर 

१७.प्लंबर 

१८.इलेक्ट्रिशियन 

१९.गिरणी कामगार 

२०.मिल कामगार 

*इत्यादी विविध प्रकारचे मजूर व कामगार


*या योजने अंतर्गत मिळणारे लाभ 

या योजनेत नोंदणी केल्यानंतर  नोंदणी केलेल्या व्यक्तीला प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजने अंतर्गत २ लाख रुपयांचा अपघाती विमा मिळणार आहे .

*सरकारच्या अन्य विविध योजनांचा लाभ नोंदणीकृत व्यक्तीला मिळणार आहे .

या नोंदणी नंतर तुम्हाला अधिकृत नोंदणी क्रमांक मिळेल व तुमची माहिती श्रम -व रोजगार मंत्रालयाकडे नोंद होईल .


*आवश्यक कागदपत्रे -आधार कार्ड,आधार लिंक असलेला मोबाइल नंबर

*ई-श्रम कार्डसाठी नोंदणी कुठे करता येणार ?



ई -श्रम कार्डसाठी नोंदणी करण्याकरिता तुम्हाला तुमच्या परिसरातील सरकारच्या अधिकृत CSC  (Customer Service Point )  केंद्रात नोंदणी करता  येणार आहे .



Wednesday, December 29, 2021

कोलगेट स्माईल प्लिज 30000 रु स्कॉलरशिप मिळणार!

 कोलगेट स्माईल प्लिज स्कॉलरशिप 2021अर्ज करण्यास केवळ दोन दिवस बाकी!




इयत्ता 10 वि व 12वि परीक्षा 2021 या वर्षी उत्तीर्ण असणाऱ्या विद्यार्थ्यांना कोलगेट स्माईल प्लिज फाउंडेशन स्कॉलरशिप देत आहे.


*काय आहे ही स्कॉलरशिप?

तर मित्रानो कोलगेट एक सामाजिक बांधिलकी या नात्याने  विद्यार्थ्यांना प्रोत्साहन पर उच्च शिक्षणासाठी स्कॉलरशिप देऊ करीत आहे.कोलगेट उद्योग समूह आशा विविध सामाजिक कार्यात सहभागी होऊन आपली सामाजिक बांधिलकी जप्त असतो हाही त्याचाच एक भाग आहे.


*काय आहे पात्रता ,कोण करू शकते अर्ज?

या स्कॉलरशिप करिता अर्ज करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या बाबी पुढीलप्रमाणे प्रमाणे .

*इयत्ता 10 वि उत्तीर्ण करिता-



आवश्यक कागदपत्रे-



 स्कॉलरशिप किती मिळेल-

या स्कॉलरशिप द्वारे विद्यार्थ्यांना जर विद्यार्थी 10 वीची परीक्षा उत्तीर्ण असेल व तो या स्कॉलरशिप साठी पात्र ठरत असेल तर त्याला 11 वि व 12 वि या दोन वर्षांसाठी 20000 रु.इतकी स्कॉलरशिप देण्यात येईल.


या स्कॉलरशिप द्वारे विद्यार्थ्यांना जर विद्यार्थी 12 वीची परीक्षा उत्तीर्ण असेल व तो या स्कॉलरशिप साठी पात्र ठरत असेल तर त्याला  तीन वर्षांसाठी 30000 रु.इतकी स्कॉलरशिप देण्यात येईल.


या स्कॉलरशिप करिता अर्ज करण्यासाठी केवळ दोन दिवस बाकी आहेत.होय.31 जानेवारी 2021 ही या स्कॉलरशिप साठी अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.तेव्हा लवकरात लवकर यासाठी अर्ज करा व या संधीचा लाभ घ्या


स्कॉलरशिप करिता अर्ज करा

Tuesday, December 28, 2021

राज्यात लवकरच केली जानार 50000 पोलिस पदांची भरती!

 राज्यात लवकरच केली जानार 50000 पोलिस पदांची भरती!


FROM LOKMAT PAPER
सौ.लोकमत पेपर 




पोलीस भरतीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या विद्यार्थ्यांना काहीशी दिलासा देणारी ही बातमी .महाराष्ट्र राज्य पोलीस दलामध्ये लवकरच 50000 पदांसाठी भरती घेण्यात येणार आहे.महाराष्ट्र राज्याचे  गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी ही माहिती विधानसभेमध्ये दिली आहे.यापूर्वी राज्य सरकारने 2019 मध्ये जाहीर झालेल्या भरती परीक्षेचे पेपर  हे 2021 या वर्षांमध्ये घेण्यात आले ,या मध्ये अनेक विद्यार्थ्यांनी शारीरिक व लेखी परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे आता त्यांना ट्रेनिंग साठीच्या ऑर्डर ची प्रतीक्षा लागून राहिली आहे.






        राज्याच्या गृहमंत्र्यांनी जाहीर तर केले मात्र ही भरती प्रक्रिया नेमकी कधी सुरू करण्यात येणार आहे यांबद्दल सध्यातरी काही घोषित केले नाही.यावर उत्तर एकच आहे की लवकरात लवजर ही भरती प्रक्रिया राबवण्यात येईल.यापूर्वी 13000 पदांकरिता ही भरती प्रक्रिया राबवण्यात येईल असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता .या भरती प्रक्रियेबाबतच निर्णय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात येणार आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC)राज्यसेवा पूर्वपरीक्षा २०२१ पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर !

 



महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC)राज्यसेवा पूर्वपरीक्षा २०२१ पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर !
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव काळ म्हणजे मागील दीड वर्षामध्ये अनेक उमेदवारांना परीक्षेचे वय ओलांडल्यामुळे या परीक्षेस बसता येईल कि नाही अशी भीती वाटत होती .त्यांची परीक्षेची संधी जाऊ नये म्हणून राज्य सरकारने वय ओलांडल्या गेलेल्या उमेदवारांना देखील परीक्षा देता येईल असे घोषित केले होते मात्र ,या केलेल्या घोषणेची अमलबजावणी करताना काही दिसत नव्हते.यामध्येच राज्यसेवा पूर्वपरीक्षेची नवी जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली होती .त्या पार्श्वभूमीवर हा प्रश्न महत्वाचा होता अखेर आयोगाने आपल्या अधिकृत संकेत स्थळावर प्रसिद्धी पत्रक जाहीर करून परीक्षा पुढे ढकलल्याचे जाहीर केले  आहे .

१७ डिसेंबर २०२१ रोजीच्या शासन निर्णयाची अमलबजावणी म्हणून  ही परीक्षा पुढे ढकलण्याट येत असल्याचे आयोगाद्वारे सांगण्यात आले आहे .

*काय आहे शासनाचा १७ डिसेंबर २०२१ रोजीचा  निर्णय ?
-कोरोना काळामुळे   MPSC च्या परीक्षा काही काळासाठी होऊ शकल्या नवत्या.परीक्षा न झाल्याने  विद्यार्थ्यांच्या मनस्थिती ताणतणावाची होत होती त्यात देखील वय उलटून गेल्यमुइले अनेक विद्यार्थ्यान या परीक्षांपासून वंचित रहावे लागले असते. या पार्श्वभूमीवर आयोगाद्वारे मुदतवाढ देण्याची मागणी होत होती .त्यानुसार शासनाने अध्यादेश काढून परीक्षा ममध्ये वय वाढवून  देण्यात येईल अशी सरकारद्वारे घोषणा करण्यात आली होती .शासनाच्या जाहीरनाम्यानुसार ०२ मार्च २०२० ते १७ डिसेंबर २०२१ या कालावधीमध्ये विहित कमाल वयोमर्यादा ओलांडली असेल अशा उमेदवाराना मुदतवाढ देण्यात येणार असा शासनाचा निर्णय होता .

*उमेदवारांना केव्हा करता येणार अर्ज ?
-०१ मार्च २०२० ते १७ डिसेंबर या दरम्यान व्याधिक ठरणाऱ्या उमेदवारांना २८ डिसेंबर २०२१ पासून ०२ जानेवारिऊ २०२२ पर्यंत अर्ज करता येणार आहे .ऑनलाईन पद्धतीने चलन भरण्याचा अंतिम दिनांक ०१ जानेवारी असेल तर ऑफलाईन पद्धतीने चलन भरण्याचा ०3 जानेवारी हा दिनांक असेल .


परीक्षेचा नवीन सुधारित दिनांक हा आयोगाद्वारे अधिकृत संकेतस्थळावर स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल.