Thursday, December 30, 2021

ई- श्रम कार्ड योजना असंघटित कामगारांसाठी सर्वात मोठी योजना! मिळेल 200000चे विमा संरक्षण!

 ई- श्रम कार्ड योजना 


 



 ई -श्रम कार्ड योजना .भारत देशामधील सर्व असंघटीत कामगारांसाठी एक महत्वाची गोष्ट.केंद्र सरकारच्या श्रम व रोजगार मंत्रालयाने  देशातील असंघटीत कामगारांसाठी ई श्रम कार्ड हि योजना सुरु केली आहे.या योजने अंतर्गत असंघटीत क्षेत्रातील सर्व कामगारांना एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले जात आहे त्यांची एक विशिष्ट प्रकारची नोंद ठेवण्यात येत आहे .या योजने अंतर्गत विविध क्षेत्रातील कामगारांना विविध लाभ मिळणार आहेत  तर काय आहे हि योजना व कोण कोण याचा लाभ घेऊ शकते जाणून घेऊयात संविस्तर पणे .


*ई -श्रम कार्ड योजना -



ई श्रम कार्ड या योजनेद्वारे भेटणाऱ्या माहितीचा वापर असंघटीत कामगारांच्या हितासाठी च्या योजना राबवण्यासाठी करण्यात येणार आहे .याद्वारे असंघटीत कामगारांची नोंद ठेवण्यास सरकारला मदत होणार आहे .कामगार व त्यांच्या कुटुंबासाठी कल्याण करी योजना राबवण्यात येणार आहेत .


* ई- श्रम कार्ड कोणत्या व्यक्ती बनवू शकतात ?

१.घर काम करणाऱ्या महिला 

२.लहान आणि श्रीमंत शेतकरी 

३.रस्त्यावरील विक्रेते 

४.दुध व्यवसाय करणारे शेतकरी 

५.रिक्षा चालक 

६.वृत्त पत्र विक्रेते 

७.पशुपालन करणारे कामगार 

८.शिलाई मशीन कामगार 

९.रस्ते कामगार 

१०.सुतारकाम करणारे कामगार 

११.शेत मजूर 

१२.आशा सेविका 

१३.न्हावी कामगार 

१४.बांधकाम करणारे कामगार 

१५.ब्युटी पार्लर कामगार 

१६.पेंटर 

१७.प्लंबर 

१८.इलेक्ट्रिशियन 

१९.गिरणी कामगार 

२०.मिल कामगार 

*इत्यादी विविध प्रकारचे मजूर व कामगार


*या योजने अंतर्गत मिळणारे लाभ 

या योजनेत नोंदणी केल्यानंतर  नोंदणी केलेल्या व्यक्तीला प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजने अंतर्गत २ लाख रुपयांचा अपघाती विमा मिळणार आहे .

*सरकारच्या अन्य विविध योजनांचा लाभ नोंदणीकृत व्यक्तीला मिळणार आहे .

या नोंदणी नंतर तुम्हाला अधिकृत नोंदणी क्रमांक मिळेल व तुमची माहिती श्रम -व रोजगार मंत्रालयाकडे नोंद होईल .


*आवश्यक कागदपत्रे -आधार कार्ड,आधार लिंक असलेला मोबाइल नंबर

*ई-श्रम कार्डसाठी नोंदणी कुठे करता येणार ?



ई -श्रम कार्डसाठी नोंदणी करण्याकरिता तुम्हाला तुमच्या परिसरातील सरकारच्या अधिकृत CSC  (Customer Service Point )  केंद्रात नोंदणी करता  येणार आहे .



No comments:

Post a Comment