Tuesday, December 28, 2021

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC)राज्यसेवा पूर्वपरीक्षा २०२१ पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर !

 



महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC)राज्यसेवा पूर्वपरीक्षा २०२१ पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर !
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव काळ म्हणजे मागील दीड वर्षामध्ये अनेक उमेदवारांना परीक्षेचे वय ओलांडल्यामुळे या परीक्षेस बसता येईल कि नाही अशी भीती वाटत होती .त्यांची परीक्षेची संधी जाऊ नये म्हणून राज्य सरकारने वय ओलांडल्या गेलेल्या उमेदवारांना देखील परीक्षा देता येईल असे घोषित केले होते मात्र ,या केलेल्या घोषणेची अमलबजावणी करताना काही दिसत नव्हते.यामध्येच राज्यसेवा पूर्वपरीक्षेची नवी जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली होती .त्या पार्श्वभूमीवर हा प्रश्न महत्वाचा होता अखेर आयोगाने आपल्या अधिकृत संकेत स्थळावर प्रसिद्धी पत्रक जाहीर करून परीक्षा पुढे ढकलल्याचे जाहीर केले  आहे .

१७ डिसेंबर २०२१ रोजीच्या शासन निर्णयाची अमलबजावणी म्हणून  ही परीक्षा पुढे ढकलण्याट येत असल्याचे आयोगाद्वारे सांगण्यात आले आहे .

*काय आहे शासनाचा १७ डिसेंबर २०२१ रोजीचा  निर्णय ?
-कोरोना काळामुळे   MPSC च्या परीक्षा काही काळासाठी होऊ शकल्या नवत्या.परीक्षा न झाल्याने  विद्यार्थ्यांच्या मनस्थिती ताणतणावाची होत होती त्यात देखील वय उलटून गेल्यमुइले अनेक विद्यार्थ्यान या परीक्षांपासून वंचित रहावे लागले असते. या पार्श्वभूमीवर आयोगाद्वारे मुदतवाढ देण्याची मागणी होत होती .त्यानुसार शासनाने अध्यादेश काढून परीक्षा ममध्ये वय वाढवून  देण्यात येईल अशी सरकारद्वारे घोषणा करण्यात आली होती .शासनाच्या जाहीरनाम्यानुसार ०२ मार्च २०२० ते १७ डिसेंबर २०२१ या कालावधीमध्ये विहित कमाल वयोमर्यादा ओलांडली असेल अशा उमेदवाराना मुदतवाढ देण्यात येणार असा शासनाचा निर्णय होता .

*उमेदवारांना केव्हा करता येणार अर्ज ?
-०१ मार्च २०२० ते १७ डिसेंबर या दरम्यान व्याधिक ठरणाऱ्या उमेदवारांना २८ डिसेंबर २०२१ पासून ०२ जानेवारिऊ २०२२ पर्यंत अर्ज करता येणार आहे .ऑनलाईन पद्धतीने चलन भरण्याचा अंतिम दिनांक ०१ जानेवारी असेल तर ऑफलाईन पद्धतीने चलन भरण्याचा ०3 जानेवारी हा दिनांक असेल .


परीक्षेचा नवीन सुधारित दिनांक हा आयोगाद्वारे अधिकृत संकेतस्थळावर स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल.




No comments:

Post a Comment