राज्यात लवकरच केली जानार 50000 पोलिस पदांची भरती!
| सौ.लोकमत पेपर |
पोलीस भरतीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या विद्यार्थ्यांना काहीशी दिलासा देणारी ही बातमी .महाराष्ट्र राज्य पोलीस दलामध्ये लवकरच 50000 पदांसाठी भरती घेण्यात येणार आहे.महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी ही माहिती विधानसभेमध्ये दिली आहे.यापूर्वी राज्य सरकारने 2019 मध्ये जाहीर झालेल्या भरती परीक्षेचे पेपर हे 2021 या वर्षांमध्ये घेण्यात आले ,या मध्ये अनेक विद्यार्थ्यांनी शारीरिक व लेखी परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे आता त्यांना ट्रेनिंग साठीच्या ऑर्डर ची प्रतीक्षा लागून राहिली आहे.
राज्याच्या गृहमंत्र्यांनी जाहीर तर केले मात्र ही भरती प्रक्रिया नेमकी कधी सुरू करण्यात येणार आहे यांबद्दल सध्यातरी काही घोषित केले नाही.यावर उत्तर एकच आहे की लवकरात लवजर ही भरती प्रक्रिया राबवण्यात येईल.यापूर्वी 13000 पदांकरिता ही भरती प्रक्रिया राबवण्यात येईल असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता .या भरती प्रक्रियेबाबतच निर्णय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात येणार आहे.
No comments:
Post a Comment