Friday, December 31, 2021

प्रधानमंत्री ग्रामीण डिजिटल साक्षरता अभियान योजना मिळेल मोफत कॉम्प्युटर कोर्स सर्टिफिकेट !

* प्रधानमंत्री ग्रामीण डीजिटल साक्षरता अभियान 



*PMGDISHA योजना  


*काय आहे PMGDISHA योजना ?

         तर मित्रानो आज आपण जाणून घेणार आहोत प्रधानमंत्री ग्रामीण डिजिटल साक्षरता अभियान PMGDISHA या योजनेविषयी .मित्रानो गांधीजी म्हणायचे खेड्याकडे चला अर्थात राष्ट्रपिता महात्मा गांधीजींना कळून चुकले असावे कि जर भारताला  विकास साधायचा असेल तर खेडे विकसित होणे आत्मनिर्भर बनणे अत्यंत आवश्यक आहे .२०२० च्या आकडेवारीनुसार जवळपास आपल्या भारत देशातील ६५ टक्के इतकी लोकसंख्या हि खेड्यामध्ये राहते .खेड्यामध्ये राहणाऱ्या या मोठ्या लोकसंखेत पूर्वी साक्षरतेचा अभव दिसून येत होता ,सरकारने केलेल्या विविध योजनांचे स्वरूप म्हणून हे चित्र आता पालटू लागले आहे .सध्याच्या  या डिजिटल युगात मात्र केवळ साक्षर असून जमत नाही तर प्रत्येक व्यक्ती हि डिजिटल साक्षर असायला हवी तिला संगणकाचे मुलभूत ज्ञान असणे आवश्यक आहे .केंद्र सरकारच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाद्वारे याच दृष्टीकोनातून PMGDISHA हि योजना राबवण्यात येते .या योजनेचे उद्दिष्ट हे ग्रामीण जनतेस डिजिटल साक्षर बनवणे व त्यांचे जीवन आणखीन सुखकर बनवणे  आहे .

                                 



*PMGDISHA योजनेचे उद्दिष्ट्ये -

*ग्रामीण भागातील नागरिकांना संगणक किवा डिजिटल एक्सेस उपकरणे (जसे कि स्मार्ट  फोन,संगणक ,ल्यापटप ,)चालविण्याचे प्रशिक्षण देऊन सकाशम करणे ,इमेल पाठवणे आणि प्राप्त करणे ,इंटरनेट ब्राउज करणे ,सरकारी सेवांमध्ये प्रवेश करणे ,माहिती शोधणे हे या योजनेचे वैशिष्ट्य आहे . 


PMGDISHA योजनेचे फायदे -

*ग्रामीण भागामध्ये खेड्यामध्ये राहणाऱ्या व्यक्तीस कॉम्प्युटर चालवणे ,डिजिटल उपकरणे चालवणे शिकणे ,मोफत व सहजरीत्या उपलब्ध होत आहे यासोबतच कॉम्प्युटर कोर्सचे मोफत सर्टिफिकेट देखील मिळणार आहे . .



या योजनेकरिता आवश्यक पात्रता -

या योजनेचा लाभ घेण्याकरिता व्यक्तीचे वय हे १४ ते ६० वर्षांच्या दरम्यान असायला हवे . .

कुठे करता येणार याची नोंदणी


PMGDISHA  नोंदणी करण्याकरिता तुम्हाला तुमच्या परिसरातील सरकारच्या अधिकृत CSC (Customer Service Point ) केंद्रात नोंदणी करता  येणार आहे 


*आवश्यक कागदपत्रे -

आधार कार्ड ,मोबाईल नंबर ,इमेल आयडी 




No comments:

Post a Comment