चालू घडामोडी दिनांक ०८ जानेवारी २०२२
*जगप्रसिद्ध भौतिक शास्त्रज्ञ स्टीफन हव्किंग्स यांची आज जयंती त्यांच्या ८० व्या जयंती निमित्त गुगलने खास डूडल साकारले होते .वयाच्या २१ व्या वर्षी या नर्वस सिस्टीमच्या amyotrophic lateral sclerosis (ALS) रोगाने त्यांना ग्र्सले होते त्यामुळे त्यांनी हळहळू हालचाल करण्याची व बोलण्याची क्षमता गमावली तरीही त्यांनी कम्प्युटर जन्रेतेद व्हाईस द्वारा संभाषण सुरु ठेवले व अनेक वैज्ञानिक शोध लावले.ते अनेक शास्त्रज्ञांचे प्रेरणा स्थान आहेत .या थोर शास्त्रज्ञाला जयंती दिनी अभिवादन .....
*स्टीफन हॉकिंग यांचे काही महत्वाचे विचार:
गमती नसतील तर आयुष्य एक शोकांतिका ठरेल
जरी मी हालचाल करु शकत नसलो, मला बोलण्यासाठी कॉम्प्युटरची मदत घ्यावी लागत असली, तरीही मी माझ्या मनातून मुक्त आहे
नेहमी आकाशातील ताऱ्यांकडे पाहा, आपल्या पायाखाली पाहू नका. जे पाहाल, त्याचा अर्थ समजण्याचा प्रयत्न करा. कुतूहल जागरुक ठेवा.
आयुष्य कितीही कठीण असलं तरी, त्यावर तुम्ही मात करु शकताच. तुम्ही यशस्वी व्हाल!
आपल्याला जे जे करता येईल ते सर्व करायला हवं. मात्र जे आपल्या हातात नाहीत, त्याबाबत पश्चाताप करु नये
दिव्यांगांना माझा सल्ला आहे, तुम्ही त्या गोष्टींवर लक्ष द्या, ज्या करण्यापासून तुम्हाला तुमचं अपंगत्व रोखू शकणार नाही, किंवा तुमचं अपंगत्व त्याआड येणार नाही. लक्षात ठेवा आत्म्या आणि शरीर दोन्हीही अपंग होऊ देऊ नका.
आक्रमकता मनुष्याची सर्वात वाईट सवय आहे. आक्रमकता सभ्यतेचा नाश करते.
कधीही करु शकत नाही असं काहीही नाही
जे आपल्या बुद्ध्यांकाबद्दल/ IQ बद्दल दावा करतात, ते अयशस्वी असतात
ब्रह्माण्डापेक्षा मोठं आणि जुनं काहीच नाही .
*चालू घडामोडी -
१.सहा तापमान कार्याची दिशा ,वेग आद्रता व पर्जन्यमान यांची अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी सध्या मंडळ स्थरावर काही ठिकाणी स्वयंचलित हवामान केंद्रे कार्यन्वित करण्यात आली आहेत.ही केंद्रे आता ग्रामपंचायत बसविण्यात येणार असल्याची घोषणा कृषिमंत्री दादा भुसे यांनी केली राज्यातील सहा हजार गगरम पंचायतींमध्ये अशा प्रकारे ६००० केंद्रे बसवण्यात येणार आहेत .
२.NEET PG परीक्षेच्या कौन्सलिंग प्रक्रियेचा मार्ग मोकळा झाला आहे .वैद्यकीय परीक्षा .NEET PG मध्ये प्रवेश प्रक्रियेत मागास वर्गीयांना २७ टक्के आरक्षण देण्यास सुप्रीम कोर्टाने मान्यता दिली आहे .तसेच यासोबत आर्थिक मागास वर्गीयांसाठी (आर्थिक दुर्बल )देखील १० टक्के राखीव जागा ठेवण्यास कोर्टाने मंजुरी दिली आहे .
3.तिसऱ्या राष्ट्रीय जल पुरस्कारांची केंद्र सरकारद्वारे घोषणा करण्यात आली आहे .राष्ट्रीय जल पुरस्कार २०२० मध्ये महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली नगर पंचायतीने देशात दुसरा क्रमांक पटकावला आहे .यामध्ये महाराष्ट्राला विवध श्रेणीमध्ये चार पुरस्कार प्राप्त झाले आहेत.जल संपदा व्यवस्थापन क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी हा पुरस्कार जलशक्ती मंत्रालयाद्वारे देण्यात येतो .
४.देशातील क्रुझ पर्यटनाला चालना देण्यासाठी केंद्र सरकार मोठी गुंतवणूक करणार आहे .पुढील दहा वर्षात भारतात येणाऱ्या पर्यटकांची संख्या जवळपास ४ लाखांनी वाढू शकते(१० पट ).त्या दृष्टीने सरकार योजना आखत आहे .यामध्ये पर्यटनाला चालना देण्यासाठी विवध योजना राबवण्यात येणार आहेत .
५.पंतप्रधान नरेंद्र मोदि यांच्या हस्ते कलकत्ता येथील चित्तरंजन राष्ट्रीय कर्करोग संस्थेच्या दुसर्या कॅम्पस चे उद्घाटन करण्यात आले .
6.मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायधीश रामचंद्र दत्तात्रय तुळपुळे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे .१९७६ मध्ये ते मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायधीश झाले होते .
७.पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने त्यांचे पुरस्कार जाहीर केले आहेत त्यानुसार २०२१ या वर्षातला मोस्ट व्यल्युएबल प्लेअर चा पुरस्कार पाकिस्तानचा क्रिकेटर मोहम्मद रिझवान ला देण्यात आला आहे .
८. ICC ने (जागतिक क्रिकेट नियामक मंडळ )ने T २० क्रिकेटमध्ये स्लो ओव्हर रेट साठी नवा नियम घोषित केला आहे .यानुसार जर शटके टाकण्याची गती कमी राहिल्यास शेवटच्या २० व्या ओवरमध्ये सीमा रेषेवर एक फिलदार कमी लागण्याची ही शिक्षा असेल .आता दंड वसूल करण्या एवजी ही शिक्षा देण्यात येणार आहे .
९.हॉलीवूड अभिनेते सिडनी पोईटिये यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे .सिने सृष्टीमधला सर्वोच पुरस्कार ''ऑस्कर"पुरस्कार मिळवणारे ते पहिले कृष्णवर्णीय अभिनेते होते .'लिलीज ऑफ द फिल्ड' या चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना १९६३ साली ऑस्कर पुरस्कार प्रदान करण्यात आल होता .१९५० -६० च्याद्श्कातील काल त्यांनी आपल्या अभिनयाने गाजवला होता .
१०.
No comments:
Post a Comment