Monday, January 10, 2022

चालू घडामोडी दिनांक 10 जानेवारी 2022चीनला मिळाले चंद्रावर पाणी असल्याचे पुरावे!

 चालू घडामोडी दिनांक 10 जानेवारी 2022


1.जेष्ठ अभिनेते पंडित रामदास कामत यांचे वृद्धापकाळाने निधन.


2.कामगार संघटनांच्या राष्ट्रीय समनव्य समितीने चार कामगार विषयक कायदे नाकारून आपल्या मागण्यांसाठी 23 व 24 फेब्रुवारी रोजी देशव्यापी आंदोलनाची घोषणा केली आहे.


3.एआयआय बी (एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक )च्या उपाध्यक्ष पदी उर्जित पटेल यांची निवड करण्यात आली आहे.उर्जित पटेल हे रिजर्व बँकेचे माजी गव्हर्नर आहेत.


4.देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी बँक असणाऱ्या पीएनबि बँकेने सेवा शुल्कात वाढ केली आहे.आता खात्यामध्ये किमान 10000 रुपये ठेवावे लागणार आहेत.


5.एटिपी स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच सोबत खेळत असणाऱ्या रामकुमार रामनाथन व रोहन बोपन्ना यांनी अडलेड इंटरनॅशनल टेनिस स्पर्धेत विजेतेपद पटकावले.


6.महानायक अमिताभ बच्चन याना सचिन तेंडुलकर बद्दल केलेल्या चुकीच्या ट्विट बद्दल त्यांनी सचिन ची माफी मागितली आहे.सचिनने लिजेन्ड्स क्रिकेट मध्ये खेळणार असे म्हटले होते.


7.श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने त्यांच्या खेळाडूंसाठी नवे नियम जाहीर केले आहेत त्यानुसार आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्या श्रीलंकन खेळाडूंना क्रिकेट मधून निवृत्ती घेण्याआधी तीन महिने आधी  नोटीस देऊन बोर्डाला कळवावे  लागणार आहे.


8.चंद्राच्या पृष्ठभागावर पाण्याच्या अस्तित्वाचे पुरावे  चीनच्या चेंग 5 या लँडरला मिळाले आहेत.



No comments:

Post a Comment