Friday, January 7, 2022

चालू घडामोडी दिनांक ०७ /०१/२०२२ ,भारतात होणार चित्त्याचे आगमन !

 चालू घडामोडी दिनांक ०७ /०१/२०२२ 



१ .उसाला एफआरपी किवा एसएमपी पेक्षा जास्त दिलेला दर कारखान्यांचा नफा समजून त्यावर लावण्यात आलेला प्राप्तीकर हा उत्पादन खर्च समजून याबाबत   कारखान्यांवर दाखल केलेले दावे निकाली काढण्याचे आदेश केंद्रीय वित्त मंत्रालयाचे अवर सचिव सौरभ जैन यांनी काढले .

२.राज्यातील शासकीय महाविद्यालयांमध्ये बस्तर डोस दिला जाणार आहे .ओमिक्रोन या कोरोनाच्या नव्या वेरीयंट च्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे .

3.पत्रकारिता क्षेत्रातील योगदानाबद्दल जेष्ठ पत्रकार व माजी खासदार कुमार केतकर यांना २०२१ या वर्षाचा मंत्रालय आणि विधीमंडळ कृ.पा.समक जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे .

४.दादरा -नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशाच्या प्रशासकाला ०२ ऑगस्ट रोजी सार्वजनिक सुट्टी घोषित घोषित करण्याचे निर्देश देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे .यावेळी कोर्टाने नागरिकांना सार्वजनिक सुटीचा कोणताही मुलभूत अधिकार संविधानात नमूद नसल्याचे म्हटले आहे .

५.केंद्र सरकार आफ्रिकन चित्त्याला भारतात आणण्याची योजना तयार करत आहे या योजनेनुसार आफ्रिकन चित्त्याला भारतात आणून स्थायिक करण्यात येणार आहे .इथल्या वातावरणाशी त्यांनी जुळवून घेतल्यास ही योजना यशस्वी होण्यास वेळ लागणार नाही ..  

6.राज्य सरकारने राज्याच्या लोकायुक्ताना दिलेल्या माहितीनुसार राज्यातील शासकीय जिल्हा परिषदांच्या इमारती साठी जागा भाडे तत्वावर घेतली असल्यास त्याचे भाडे दिले जाईल असे स्पष्ट केले आहेत .याचा लाभ राज्यातील १५०० हजार जणांना होणार आहे .

७.पागोन्ग सरोवराच्या उत्तर आणि दक्षिण टोकाला पूल चीनकडून उभारला जात आहे .या घटनेचा  भारताकडून निषेध करण्यात आला आहे .















केंद्र सरकारने निवडणुकीसाठी करण्यात येणाऱ्या खर्चाच्या रकमेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे .या निर्णयानुसार आता लोकसभेच्या निवडणुकीसाठी ९५ लाख तर विधानसभेच्या निवडणुकीसाठी ४० लाख इतका खर्च उमेदवाराला करता येणार आहे .हा निर्णय लोकसंख्या व क्षेत्रफळाने मोठ्या असणार्या राज्यांसाठी लागू असेल.गोव्यासारख्या लहान राज्यांकरिता लोकसभा मतदार संघासाठी ७५ लाख व विधानसभेसाठी २८ लाख रुपये एवढी मर्यादा कण्यात आली आहे .



No comments:

Post a Comment