Wednesday, January 12, 2022

आता महाराष्ट्रात लागणार फक्त मराठी पाट्या !

* आता महाराष्ट्रात लागणार फक्त मराठी पाट्या !




             आता महाराष्ट्रा मधील सर्व छोटे मोठे व्यापारी व आस्थापनांना आपल्या नवाच्या पाट्या (फलक )आता मराठीमध्ये लावावे लागणार आहेत .राज्य सरकारने याबाबत तसा निर्णय घेतला आहे .या निर्णयामुळे महाराष्ट्रात राहून देखील मराठीला विरोध करणार्याना मोठी चपराक बसली आहे.मराठी अस्मितेचा हा विषय मराठी माणसाच्या जिव्हाळ्याचा होता .काही लोकांचा महाराष्ट्रात राहून देखील मराठी बोलण्यास तिचा प्रसार करण्यास नकार होता .मराठीचा असा द्वेष करणाऱ्या या काही व्यापारी वर्गाला हा मोठा दणका म्हणावा लागेल .



                       मुळात महारष्ट्रात सध्या महाविकास आघाडीचे सरकार शासन करत आहे .या महाविकास आघाडीतील महत्वाचा पक्ष असणार्या शिवसेनेचा मराठी माणूस ,मराठी अस्मिता हा विषय त्यांचा ओर्मुख अजेंडा आहे .मराठी अस्मितेचा हा विषय हाताळताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व त्यांच्या मंत्रिमंडळाने हा महत्वपूर्ण निर्णय जाहीर केला .



*काय आहे हा निर्णय -

        बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये काही महत्वाचे  निर्णय घेण्यात आले त्यामध्ये हा महत्वाचा निर्णय ठरला .या निर्णयानुसार राज्यातील सर्व लहान मोठ्या व्यापार्यान दहा पेक्षा कमी किवा जास्त कामगार संख्या असलेल्या दुकाने व आस्थापनांना देवनागरी लिपीत मराठी भाषेमध्ये नामफलक लावणे बंधनकारक करण्यात आले आहे .मराठी भाषेबरोबरच इतर भाषेमध्ये देखील नाम फलक लावता येणार आहेत.मात्र मराठी भाषेतील नामफलक प्रारंभी लावावा लागेल तसेच इतर भाषेतील अक्षर प्रमाणे त्यांची उंची समान ठेवावी लागेल .यासोबतच दारू विक्री करणाऱ्या दुकानांना ,रेस्तोरांत ला महापुरुष ,गडकिल्ले,आदरणीय महिलांची नवे देऊ नयेत असा देखील निर्णय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आला आहे . 

No comments:

Post a Comment