Wednesday, January 12, 2022

आता घरूनच करता येणार मतदान !

       



 कोरोनाने आपल्या दैनदिन सवयीमध्ये  अनेक बदल आपल्याला करावे लागले .त्यातील बरेचसे बदल सकारात्मक होते .नाही नाही म्हणता म्हणता कधी हे बदल आपल्या अंगवळणी पडले ते अआप्ले आपल्यालाही कळले नाही .या कोविडच्या काळामध्ये अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचार्यांना घरून काम करण्याची मुभा दिली त्याकरिता आवश्यक साधनसामग्री जसे laptop ,tab ,मोबाईल देखील पुरवले .या गोष्टीमुळे कंपन्यांचे काम कोविड च्या काळातही व्यवस्थित पणे अगदी सहजरीत्या पण उत्तम  रीतीने  होऊ लागले .सरकारने देखील त्यांच्या कर्मचार्यांना घरून काम करण्याच्या सूचना पुरविल्या .

          याच पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने पाच राज्यातील नागरिकांना घरून मतदान करण्याची सुविधा देऊ केली आहे .या वर्षामध्ये निवडनुक आयोगाने ५ राज्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला .मात्र कोरोनाच्या नव्या व्हेरीयंट असणाऱ्या ओमाय्क्रोन या विषाणूचा देशातील प्रभाव वाढताना दिसत आहे .वाढत्या रुग्ण संखेमुळे तर काही राज्यांना पुन्हा एकदा टाळेबंदी घोषित करावी लागली आहे .त्यामुळे निवडणूक आयोगाने हि सुविधा नागरिकांना देऊ केली आहे .नागरिकांनी मतदान केंद्रात येऊनच मतदान करावे असा निवडणूक आयोगाचा आग्रह आहे .मात्र जर लोकांना ते शक्य नसल्यास निवडणूक अधिकारी स्वतः  मतदारांच्या घरी जातील .



*कोणाकोणाला घरून मतदान करण्याच्या या सुविधेचा लाभ घेता येईल ?

घरून मतदान करण्याच्या या योजनेचा  जेष्ठ नागरिक ,दिव्यांग व्यक्ती व कोरोना बाधित व्यक्ती लाभ घेऊ शकतात .उत्तर प्रदेश ,पंजाब ,गोवा,उत्तराखंड ,मणिपूर या पाच राज्यातील नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतात .


*एकूण काय असेल प्रक्रिया ?

ज्या नागरिकांना या योजनेचा लाभ घ्यायचा असेल त्यांना निवडणूक आयोगाचा १२ ड हा फॉर्म भरावा लागेल 

घरून मतदान करणाऱ्या या नागरिकांची एक वेगळी यादी बनवळी जाईल .बनवलेली हि यादी राजकीय पक्ष  ,निवडणूक अधिकारी यांना हि यादी देण्यात येईल .घरून मतदान करण्याच्या या सर्व प्रक्रियेचे कॅमेरा द्वारे चित्रीकरण करण्यात येईल .



* अशा प्रकारची हि सुविधा निवडणूक आयोगाने यापूर्वी २०१९ मध्ये झालेल्या झारखंड च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळेस तेथील नागरिकांना पुरविली होती .तेव्हा या सुविधेचा वापर हा दिव्यांग नागरीकाना देण्यात आला होता  बिहारमध्ये देखील या योजनेद्वारे ३ टक्के नागरिकांनी मतदान केले होते .


No comments:

Post a Comment