Thursday, January 13, 2022

चालू घडामोडी दिनांक १३ जानेवारी २०२२

चालू घडामोडी दिनांक १३ जानेवारी २०२२ 


१.महाराष्ट्रातून अनेक उद्योग गुजरातला नेण्यात येत असल्याचे आपण आजवर एकूण होतो मात्र आता महाराष्ट्रातून प्राणीही गुजरातला शिफ्ट करण्यात येत आहेत .अनिल अंबानी यांच्या २५० एकरच्या खाजगी प्राणीसंग्रहालयासाठी महाराष्टार्तून प्राणी गुजरातला नेले जात आहेत .



२.राज्यातील सर्व दुकानांचे व आस्थापनांच्या  नावाच्या पाट्या आता मराठीमध्ये असाव्यात असा निर्णय राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आला आहे .इतर भाषांना देखील मुभा देण्यात आली आहे मात्र  मराठी अक्षरे देवनागरी लिपीतील अक्षरे हि इतर भाषे इतक्याच आकारात ठळक दिसायला हवीत .





३.बृहन्मुंबई महानगरपालिका हद्दीमधील  ५०० चौरस फुटांच्या किवा त्यापेक्षा कमी जागेच्या घरांना मालमत्ता क्र माफ करण्याच्या महानगर पालिकेच्या निर्णयाला राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे .


४.मेहता पब्लिशिंग हाउस चे MD सुनील मेहता यांचे निधन झाले आहे .अनेक दिग्गज लेखक व संस्थेशी ते जोडले गेले होते .त्यांनी अनेक मराठी पुस्तकांचे प्रकाशन केले आहे.



५.किरकोळ किमतीवर आधारित असणारा महागाई दर सहा महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर पोहचला आहे .५५.५९ टक्क्यांवर हा महागाई दर पोहचला आहे .भाजीपाला ,फळे व अन्नधान्याच्या किंतीत्न्म्ढे झालेल्या वाढीचा परिणाम म्हणून हा महागाई दर वाढला आहे .

६.देशाच्या औद्योगिक उत्पादनामध्ये गेल्या नोव्हेंबर महिन्यामध्ये १.४ टक्के इतकी वाढ नोंदवण्यात आली आहे .खाणकाम व विद्युत निर्मिती क्षेत्रात झालेल्या उत्पादन वाढीचा मुख्यत्वे यात समावेश होतो .

७.जागतिक बुद्धिबळ संघटनेने त्यांचे नवे धोरण जाहीर केले आहे .या नव्या धोरणांनुसार वयक्तिक प्रायोजकांचे बोधचिन्ह (लोगो) खेळाडूने घातलेल्या पोशाखावर जर दर्शवायचे असेल तर यासाठी जागतिक बुद्धिबळ संघटनेला खेळाडूने अतिरिक्त शुल्क द्यावे लागेल या निर्णयाचे जागतिक बुद्धिबळ खेळाडूकडून विरोध करण्यात येत आहे .

८.श्रीलंकेत सध्या जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा जानवत असल्याने श्रीलंकेला भारताकडून १ अब्ज अमेरिकी डॉलरची कर्ज मिळण्याची अपेक्षा आहे .हे कर्ज मिळावे म्हणून श्रीलंकेकडून सरकार पातळीवर वाटाघाटी सुरु आहेत . 

No comments:

Post a Comment