आता शेअर्स तारण ठेऊन मिळणार कर्ज !
काही वेळेला काही परिस्थितीमध्ये आपल्याला पैशाची खूप गरज असते .अशा वेळेस आपण कर्जाचा मार्ग स्वीकारत असतो .तुम्ही जर शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करत असाल तर तुमच्या करिता हि अत्यंत महत्वाची व आन्नादाची गोष्ट कारण आता तुम्ही विकत घेतलेल्या शेअर वर देखील तुम्ही कर्ज घेऊ शकनार आहात .तुमच्या सोयीनुसार तुम्ही तुमचे शेअर तारण ठेऊन त्यावर कर्ज मिळवू शकणार आहात .
*कुठे मिळेल शेर्स वरती कर्ज ?
जिओजित फायनानशिय्ल सर्विसेस या ब्रोकरेज फर्म ची जिओजित क्रेडिट्स हे तुम्हाला शेअर्स वरती कर्ज पुरवठा करणार आहेत .जिओजित फायनानशिय्ल सर्विसेस यांची जिओजित क्रेडिट्स हि NBFC (NON BANKING FINANCIAL COMPANY) आहे .जिओजित फायनान्शियल सर्विसेस्ने जिओजित न्याशनल सेक्युरिटीज डीपोझीटरी (NSDL)हे डिजिटल प्ल्याटफॉर्म सुरु केले आहे .याद्वारे कोणत्याही शेअर्स धारकाला शेअर्स वर कर्ज उपलब्ध होणार आहे .अशा पद्धतीची सुविधा देणारी हि पाहिलिच कंपनी आहे .
LAS या योजनेचा उद्देश हा शेअर धारकास गुंतवणूक करण्यासाठी तत्काळ निधी उपलब्ध करणे आहे किवा वैयक्तिक गरज पूर्ण होणे आहे .
*या योजने अंतर्गत कर्ज मिळवण्यासाठी कोण ठरतील पात्र ?
डीम्याट अकाऊंट असणारी शेअर धारक व्यक्ती कि जिच्या डीम्याट अकाऊंट मध्ये पात्र स्न्भाग हे विनामुल्य असावेत ,तिचा सिबिल स्कोर हा समाधानकारक आहे अशी व्यक्ती तसेच या योजने अंतर्गत nsdl मध्ये डीम्याट अकाऊंटअसणारे कर्जासाठी अर्ज करू शकतात .
*कर्ज मिळणार ऑनलाईन !
ऑनलाईन पद्धतीने तुम्ही तुमची आवडती योजना निवडू शकाल ,तसेच कागदपत्र देखील ऑनलाईन केली जातील .सर्व .कार्यवाही पूर्ण झाल्यावर लोन मंजूर करण्यात येईल .
No comments:
Post a Comment