रोजच्या बँकिंग व्यवहारांसाठी प्यान कार्ड हे आता कायमचे झाले आहे.बँकेच्या सर्वच कामासाठी हा सर्वात महत्वाचा द्स्तऐवज आहे.बँकेचे खाते उघडण्या पासून ते व्यवहार करण्यापर्यंत प्यान कार्ड हे आता आवश्यक आहे.प्यान कार्ड हे प्रत्येकाकडे असणे आता गरजेचे बनत आहे .मात्र तुम्ही वापरत असलेले प्यान कार्ड हे बनावट तर नाही ना ? बनावट प्यान कार्ड असेल तर ते कसे ओळखावे .याची आपण आज माहिती जाणून घेऊयात !
*प्यान कार्ड विषयी थोडक्यात
PAN CARD (PERMENENT ACCOUNT NUMBER )-प्यान कार्ड म्हणजे कायमस्वरूपी चा तुमचा एक प्रकारचा खाते क्रमांक .ज्याद्वारे तुम्ही बँकेमध्ये खाते उघडू शकतात .
*सध्या देशभरामध्ये बनावट प्यान कार्डची संख्या वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर प्यान कार्ड च्या सत्यतेविषयी पारख करून घेणे हे आता गरजेचे बनत चालले आहे .बनावट प्यान कार्ड सोबतच बनावट प्यान कार्ड तयार करून देणाऱ्या टोळ्यांचा वावर देशामध्ये वाढत आहे .अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी प्राप्ती क्रर विभागाने अनेक प्रकारच्या उपाययोजना केल्या आहेत ..
१.इन्कमटॅक्स विभागाने प्यान कार्डला एक क्यू आर कोड जोडलेला आहे .साधारपणे हा क्यू आर कोड प्यान कार्डच्या उजव्या बाजूला दर्शवलेला असतो .या क्यू आर कोडला स्क्यान करून तुम्ही लगेच ओळखू शकता तुमचे प्यान कार्ड वैध आहे कि अवैध .मात्र यासाठी तुम्हाला इन्कमटॅक्स विभागाचे एक एप्लीकेषण डाउनलोड करावे लागेल .
२.दुसर्या पद्धतीमध्ये तुम्हाला इन्कमटॅक्स विभागाच्याhttps://www.incometaxindia.gov.in या ऑफिशियल वेबसाईटवर जावे लागेल . व्हेरीफाय युवर प्यान कार्ड या बटनवर क्लिक करा .ओपन झालेल्या पेजवर मोबाईळ नंबर ,प्यान कार्ड नंबर ,व तुमची जन्मतारीख विचारली जाईल हि सर्व माहिती तुम्हाला द्यावी लागेल .त्यानंतर हा सर्व डेटा म्याच होतो आहे कि नाही हे पाहण्याकरिता तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर एक मेसेज येईल .व अशा पद्धतीने तुम्ही तुमचे प्यान कार्ड हे वैध आहे कि नाही हे पाहू शकता .
*जर तुमच्या तपासणीमध्ये तुमचे प्यान कार्ड तुम्हाला बनावट आढळल्यास तुम्ही याची तक्रार इन्कमटॅक्स विभागाकडे करू शकता .
No comments:
Post a Comment