फेक कॉल आल्यावर काय कराल ?
पूर्वीच्या काळी फोन नसताना संदेश पाठवले जात .कोणी घोडेस्वार ,वाटसरू या मार्फत पत्राद्वारे हे संदेशाचे आदान प्रदान केले जात .त्या नंतरच्या काळात जसे नवनवीन शोध लागत गेले तसतसे यात बदल होत गेले .व काही काळाने फोन नावाचा प्रकार अस्तित्वात आला .दूर असलेल्या ठिकाणांमध्ये संवादाद्वारे संपर्क साधणारीहि यंत्रणा टेलिफोन ग्राहम बेलने पहिला फोन तयार केला व इथपासून फोनचा वापर करण्यास सुरुवात होऊ लागली .कालानुरूप त्याचे विविध शोधाद्वारे आधुनिकीकरण झाले व आज जे आपल्याला त्याचे रूप पाहायला मिळते ते स्मार्ट फोन हाही एक आधुनिक प्रकार आहे .आजकाल फोन हा दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य भाग बनत चालला आहे .केवळ संभाषणा पुरताच त्याचा वापर सीमित न राहता त्याचा आवाका खूप मोठा बनला आहे .पण जसे याचे उपयोग अनेक ,हा वापरण्याचे जसे फायदे अनेक तसेच त्याच्या सुरक्षेलाही तसेच महत्व आहे .आपल्या स्मार्ट फोनच्या सुरक्षेविषयी आपण खरच जागरूक आहोत का ?आपल्या फोनवर कुणी फेक कॉल किवा मेसेज केला तर काय करायचे ?तो फेक नंबर कसा ओळखायचा ?या सर्वाची माहिती आज आपण पाहणार आहोत .
पूर्वी ल्यांडलाईड प्रकारचे फोन होते .या फोनवर येणारे कॉल्स हे नेमके कोणाचे हे कळत नसत .त्यामुळे काही काळाने संशोधन होऊन ल्यांडलाईड फोनवर आलेले कॉल्स कोणाचे हे समजावे यासाठी डिस्प्ले स्क्रीन बसवण्यात आली .पुढील काळामध्ये मोबाईल ची निर्मिती झाली त्यावर या सर्व सुविधा उपलब्ध असल्यामुळे कोनि फोन केला हे कळणे सोपे झाले .android टेक्नोलोजी ने तर फोनच्या व्याख्याच बदलून गेल्या व स्मार्ट फोन जन्माला आला .या टेक्नोलोजी सोबतच आपल्या मोबाईल वर विवध सुविधा देणारे एप हि उपलब्ध झाले .
आपल्या कडे असलेल्या नंबर्स पैकी कोणता नंबर कोणाचा तो फेक आहे कि नाही हे सांगणारे शेकडो एप्स सध्या आपल्याला गुगलवर उपलब्ध आहेत .त्यापैकी trucaller हे एप सध्या लोकप्रिय ठरले आहे .मात्र आता हे एप वापरणाऱ्या व्यक्तींनी यावरही उपाय शोधले आहेत .आता खोटी नावे टाकून आयडी बनवले जातात .त्यामुळे फेक नंबर शोधणे कठीण बनत चालले आहेत .
*कुठे शोधाल फेक कॉल शोधणारे एप्स -फेक कॉल शोधणारे हे एप्स तुम्ही गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करू शकता .*फसवणुकीचे वाढले प्रकार -*कॉल द्वारे फसवणूक करण्याचे प्रमाण वाढले आहेत .अमुक मंत्री बोलतोय ,बँकेतून बोलतोय अशा बतावणी करून एप व कॉल द्वारे फसवणूक करण्याचे प्रकार वाढताना दिसत आहेत .
No comments:
Post a Comment