Wednesday, January 19, 2022

चीनने बनवला स्वतः चा चंद्र!😲

 चीनने बनवला स्वतः चा चंद्र!😲








  चीनने स्वतः चा चंद्र बनवला आहे .विश्वास नाहीना बसत पण हे सत्य आहे.चिन्यांच्या अजब देशात आशा गजब गोष्टी घडणार नाहीत असं कस होईल?अमेरिकेला सतत महासत्तेच्या स्पर्धेत मागे टाकण्याचा चंग बांधणाऱ्या या चीनने स्वतः चा सूर्य बनवण्या पाठोपाठ आता चंद्र देखील बनवला आहे म्हणे.जगभरात कोरोनाच्या विषाणू ला पसरवल्याने चीनची नाचक्की झाली .मात्र त्याचा थोडदही फरक त्यांना पडल्याचे दिसत नाही.विविध क्षेत्रांमध्ये संशोधन करून नवनविन शोध लावण्याचे त्यांचे स्तर एकसारखे सुरूच आहे .


*चंद्राच्या वातावरणाची हुबेहूब निर्मिती:

  चीन मधल्या जियंगझु या नावाच्या प्रांतामध्ये चिनी शास्त्रज्ञांनी चंद्राच्या भूमीसारखा प्रदेश व वातावरण निर्माण केले आहे.या भागामध्ये चंद्रावर जसे वातावरण असते अगदी तसेच वातावरण येथे शास्त्रज्ञांनी निर्माण केले आहे.तेथे चांद्रप्रमाणे गुरुत्वाकर्षण बळ देखील कार्यरत राहत नाही .जेवढा वेळ हवे असेल तेवढा वेळ हे वातावरण तयार ठेवता येते.



चीनने बनवलेला हा कृत्रिम चंद्र आहे तरी कसा?

  चीनने तयार केलेल्या या कृत्रिम चंद्राचा व्यास हा दोन फूट आहे.येथील वातावरण अगदी चंद्राच्या वातावरणाशी मिळतेजुळते आहे.या वातावरणामध्ये शास्त्रज्ञांनी कृत्रिम ऑक्सिजन मिसळला आहे.चंद्राच्या जमिनीवर असलेल्या डोंगर ,खडक ,मातीप्रमाणेच इथली रचना आहे.


हा असा कृत्रिम चन्द्र बनवण्यामागे चंद्राच्या जमिनीचा चंद्राचा अभ्यास करणे ,चंद्राच्या वातावरणाचा अभ्यास करणे ,व चंद्राला जाणून घेण्याचा उद्देश आहे.


चीनच्या शास्त्रज्ञांनी असा कृत्रिम चंद्र बनवण्याची प्रेरणा एका रशियन शास्त्रज्ञांच्या प्रयोगावरून घेतली आहे.असा प्रयोग करून चंद्राच्या वातावरणाचा अभ्यास करणे हे त्यांचे उद्देश आहे.

   

No comments:

Post a Comment