PM KISAN SCHEME
*प्रधानमंत्री किसान योजना
नमस्कार मित्रानो रोजच्या चालू घडामोडी या ब्लॉग मध्ये स्वागत आहे . आपण मागील काही दिवसांपासून देशामध्ये ,राज्यामध्ये सरकारने लागू केलेल्या योजनांची माहिती घेत आहोत .इथून पुढेही आपण रोज नवनवीन योजनांची माहिती घेत राहणार आहोत .तर आज आपण पीएम किसान या योजनेची माहिती जाणून घेणार आहोत .
*काय आहे पीएम किसान योजना ?
भारतामधील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची अशी योजना भारतामध्ये राबवण्यात येत आहे .या योजनेचे पूर्ण नाव प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना असे आहे .या योजने अंतर्गत आतापर्यंत १.६ लाख करोड रुपयांच्या रकमेचे वाटप लाभार्थी शेतकर्यांना करण्यात आले आहे .या योजनेची सुरुवात फेब्रुवारी २०१९ पासून करण्यात आली .
*या योजनेचे फायदे -
पीएम किसान या योजने अंतर्गत अल्प भूधारक शेतकर्यांना वार्षिक ६००० इतकी रक्कम आर्थिक सहायता या उद्देशाने लाभार्थी शेतकरी कुटुंबाला २००० रुपयांच्या तीन हप्त्यांद्वारे देण्यात येते .शेतकरी कुटुंबाला सहायता याद्वारे करण्यात येते .
कोण घेऊ शकते या योजनेचा लाभ /या योजने करिता काय आहेत पात्रतेचे निकष ?
*०२ हेक्टर जमीन असणारे शेतकरी सुरुवातीला या योजनेकरिता पत्र ठरत होते मात्र आता सरकारने बदलेल्या नव्या निकषांनुसार आता सर्वच शेतकरी या योजनेकरिता पात्र असणार आहेत म्हणजेच आता शेतकर्यांना ०२ हेक्टर जमिनीची अट असणार नाही .
*हे व्यक्ती नसतील या योजनेचा लाभ घेण्यास पात्र ?
घटनात्मक पदावरील कोणतीही व्यक्ती ,आजी -माजी सरकारी कर्मचारी,सनदी लेखापाल ,वकील ,लोकप्रतिनिधी ,आमदार ,खासदार ,महापौर,इंजिनिअर ,डॉक्टर .व्यक्ती या योजनेचा लाभ घेण्यास अपात्र असतील .
*पीएम किसान योजनेसाठी नाव नोंदणी कुठे करायची ?
खालील ठिकाणी या योजनेसाठी नोंदणी करता येणार आहे .
१.शेतकरी गावातील तलाठी कार्यालयात कागदपत्रे जमा करू शकतात .यासाठी आधार कार्ड व बँक पासबुक ची गरज लागणार आहे .
२.जवळील CSC सेंटर मध्ये जाऊन देखील या योजने करिता अर्ज करता येईल .
* या योजनेसाठी अर्ज करण्याकरिता आवश्यक कागदपत्रे ?
१. आधार कार्ड
२. बँक पासबुक
३. मोबाईल नंबर
४.इमेल आयडी
५.रेशन कार्ड
६.७ /१२ , ८ अ
*हप्त्याचे वाटप झालेले कसे कळणार ?
शेतकर्यांनी नोंदणी करताना दिलेला मोबाईल नंबर रक्कम जमा झाली कि नाही हे कळण्यासाठी महत्वाची भूमिका निभावणार आहे .बँकेशी रजिस्टर असणार्या मोबाईल नंबर वरती sms द्वारे पैसे जमा झाल्याची माहिती कळेल .आतापर्यंत PM KISAAN या योजनेचे एकूण देशातील शेतकर्यांना ०९ हप्त्यांचे वाटप करण्यात आले आहे .
No comments:
Post a Comment