Monday, January 3, 2022

चालू घडामोडी दिनांक ०३ / जानेवारी २०२२

चालू घडामोडी दिनांक ०३ / जानेवारी २०२२ 


१.देशभरात आजपासून १५ ते १८ वर्ष वयोगटातील मुलांच्या लसीकरण कार्यक्रमास सुरुवात होत आहे .या मुलांच्या लसीकरणासाठी कोव्याक्सीन ही भारत बायोटेक निर्मित लस वापरण्यात येत आहे .महाराष्ट्रातील ६५० केंद्रांवर सुमारे ८ लाख मुलांचे लसीकरण करण्यात येणार आहे .

२.उदगीर(लातूर)येथे होणाऱ्या ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी भारत ससाणे यांची निवड झाली आहे .हे संमेलन एप्रिल २०२२ या काळात उदयगिरी महाविद्यालयाच्या प्रांगणात होणार आहे .


3.आर्थीक दुर्बल घटकासाठी असणारी आठ लाख उत्पन मर्यादेची तरी सदस्यीय समितीची शिफारस स्वीकारण्याचा निर्णय घेतल्याची माहिती केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयामध्ये  सादर केली आहे.

४.कोरोन रुग्ण संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर पाचीम बंगाल सरकारने राज्यामध्ये पुन्हा निर्बंध लागू केले आहेत .त्यानुसार तेथील शिक्षण संस्था बंद तर सर्व कार्यालये ही ५० टक्के उपस्थिती मध्ये सुरु राहणार आहेत .

५.कोरोनामुळे दिल्लीतील जागतिक पुस्तक प्रदर्शन रद्द करण्यात आले आहे .राष्ट्रीय पुस्तक न्यासाद्वारे हे सम्मेलन आयोजित करण्यात येणार होते .

६.विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी त्याच्यातील जिज्ञासा वाढावी यासाठी राज्यभरातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये १०  दिवसांकरिता वाचन अभियान राबवण्यात येणार आहे .विद्यार्थ्यांना वाचनाची सवय लागावी याकरिता हा उपक्रम राज्याच्या मदतीने केंद्र सरकारद्वारे राबवण्यात येणार आहे .


७ . उस उत्पादकांना भारताने दिलेल्या निर्यात अनुदान हे उस उत्पादनाच्या एकूण १० टक्यापेक्षा जास्त  असून ते कृषी कराराशी विसंगत असल्याची तक्रार जागतिक व्यापार संघटनेचे सदस्य असणार्या ब्राझील ,ऑस्ट्रेलिया ,ग्वाटेमाला या देशांनी केली होती .याला भारताने आव्हान दिले आहे .उस उत्पादनामध्ये ब्राझील हा जगात पहिला देश आहे तर त्यापाठोपाठ भारत हा दुसर्या क्रमांकाचा देश आहे.


८ .जेम्स बॉंड या जगप्रसिद्ध गुप्तहेराची भूमिका साकारणाऱ्या  द्यानियाल क्रेग यांना खर्या गुप्त हेरांसाठी देण्यात येणारा कॉम्पानिय्न ऑफ द ऑर्डर ऑफ सेंट मायकेल अंड सेंट जॉर्ज सिएम्जी  हा पुरस्कार जाहीर करण्यात आल आहे .ब्रिटिशंकरिता उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुप्त हेरांना  हा पुरस्कार देण्यात येत असतो .



No comments:

Post a Comment