Sunday, January 2, 2022

चालू घडामोडी दिनांक ०2-01-२०२२

चालू घडामोडी दिनांक ०२ -०१ -२०२२ 


१.वैद्यकीय क्षेत्रात विशेष कामगिरी केल्याबद्दल कोविद तस्क फोर्सचे सदस्य डॉ.शशांक जोशी यांना IMA(इंडियन मेडिकल असोसिएशन )ने विशेष पुरस्काराने सन्मानित केले आहे पटना येथील ९६ व्या ऑल इंडिया मेडिकल परिषदेमध्ये त्यांचा सन्मान करण्यात अला आहे  .

२.महाराष्ट्र राज्यातील जीएसटी क्र संकलनामध्ये १००० पकोटी रुपयांची वाढ नोंदवण्यात आली आहे .राज्यामध्ये नोव्हेंबर मध्ये १८ हजार ६५६ एवढे जीएसटी क्र संकलन करण्यात आले होते त्या तुलनेत डिसेंबर मधील आकडेवारीनुसार १९ हजार ५९२ कोटींचे जीएसटी क्र संकलन नोंदवण्यात आले आहे .

३.कोरोना उपचारासाठी तोंडावाटे घेण्याच्या औषधाला दिजिसिए द्वारे मान्यता देण्यात आली आहे .मोलनुपिरवीर असे या औषधाचे नाव आहे.कोरोनाची सौम्य लक्षणे असणार्या रुग्णांवर या औषधाद्वारे उपचार करण्यात येणार आहेत .एम क्योर फार्मास्युतीक्ल्स हि कंपनी हे औषध आथ्व्दाभाराम्ध्ये बाजारात उपलब्ध करून देणार आहे .


४.MPSC द्वारे शासनाच्या पदांच्या मागणीचे पत्र जाहीर करण्यात आले आहे त्यानुसार ७ ४६०  इतक्या पदांची जागा रिक्त आहे 


५.महाराष्ट्र सरकारने सर्व शासनाच्या विभागांसाठी  इलेक्ट्रिक वाहने वापरण्याचा निर्णय घेतलेला होता या निर्णयाची अमलबजावणी हि ०१ एप्रिल रोजी करण्यात येणार होती मात्र  पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी जाहीर केल्यानुसार आता इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करण्याची अमलबजावणी हि ०१ जानेवारी २०२२ अर्थात नवीन वर्षापासून करण्यात येणार आहे .


६. .तामिळनाडू पोलिसांनी शुद्ध पाचूचे ५०० कोटी रुपये किमतीचे एक शिवलिंग एका व्यक्तीच्या लॉक्र मधून जप्त केले आहे .

७.यापूर्वी फक्त गोव्यात आढळून येणारे एका प्रजातीचे बेडूक महाराष्ट्रात पहिल्यांदाच आढळून आले आहे गोएन क्रिकेट फ्रॉग असे त्याचे नाव आहे कोल्हापूरच्या पटणे गावात ते आढळून आले आहे .

८.पंजाबमध्ये वायुसेनेच्या तळावर आता भारताने एस ४०० या क्षेपणास्त्र युनिट यंत्रणा तैनात केली आहे .
या यंत्रणेद्वारे पाकिस्तान व चीन या कोणत्याही देशाच्या हल्ल्याला भारत परतवून लावन्यास सक्षम आहे .हि यंत्रणा भारताने रशियाकडून विकत घेतलेली आहे .

९ .दिल्ली सरकारने शिक्षण क्षेत्राच्या बाबतीत एक महत्वाचा निर्णय घेतला आहे .दिल्ली मध्ये लवकरच शिक्षक विद्यापीठ तयार करण्यात येणार असल्याची माहिती दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी दिली .दिल्लीतील ब्क्क्कार्वाला गाव येथे ५००० विद्यार्थी क्षमतेचे हे विद्यापीठ उभारण्यात येणार आहे .

१० .मेरठ येथे ७०० कोटी रुपये खर्चून निर्माण करण्यात येणाऱ्या मेजर ध्यानचंद क्रीडा विद्यापीठाची  पायाभरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते  करण्यात आली 




No comments:

Post a Comment