*आज 12 जानेवारी आज युगपुरुष स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाबाई भोसले यांची जयंती.
१. जेष्ठ मराठी अभिनेत्री रेखा कामत यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे .गृहदेवता,मी तुळस तुझ्या अंगणी,कुबेराचे धन हे काही त्यांचे गाजलेले चित्रपट .
२.जेष्ठ व्हायोलीन वादक पंडित भालचंद्र देव यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे.
३.विविध विकासकामे व इतर कामांसाठी मोठ्या संख्येने झाडे कापण्याच्या प्रक्रियेची छाननी करण्यासाठी महाराष्ट्रराज्य वृक्ष प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे .आत२०० पेक्षा जास्त झाडे कापण्याबाबतचे प्रस्ताव महापालिका स्तरावर तपासले जाणार नसून ते राज्य पातळीवर तपासले जाणार आहेत .
४.२०१६ मध्ये सुरु झालेल्या पंतप्रधान सुरक्षित मातृत्व अभियान योजनेचा आता पर्यंत देशातील ३ कोटी महिलांना लाभ मिळाला आहे .गर्भवती मतांचे व बालकांचे मृत्यू रोखण्यासाठी हि योजना सुरु करण्यात आली आहे .३ ते ६ महिन्याच्या गर्भवती महिला या योजने चा लाभ घेऊ शकतात .
५.कर्जाच्या संकटाचा सामना करणाऱ्या वोडाफोन आयडिया वी ने स्पेक्ट्रम लिलावाच्या ह्प्त्यांशी संबंधित १६ हजार कोटी रुपयांच्या व्याजाची संपूर्ण रक्कम आणि एजीआर थकबाकी एक्वितीम्ध्ये रुपांतरीत करण्यास मान्यता दिली आहे त्यामुळे आता वोडाफोन-आयडिया मध्ये केंद्र सरकारची हिस्सेदारी ३५.८ टक्के इतकी असणार आहे .
६.आयपीएल चे टायटल प्रायोजक आता बदलणार आहे .यापूर्वी टायटल प्रायोजक हे विवो हि कंपनी होती मात्र आता भारतातील सर्वात मोठा उद्योग समूह असणार्या tata समुहाने हि प्रयोज्काची जागा घेतली आहे .tata ने ०२ वर्षाचा करार करताना बीसीसीआय ला आयपीएलच्या टायटल प्रयोजक्तेसाठी ६७० कोटी रुपये देणार आहे .
७.बिहार राज्यामध्ये ओमाय्क्रोन चा जेनेटिक प्याटर्न असणारा बी ए २ हा विषाणू आढळून आला आहे या व्ह्रेरीयंट चा डेल्टा पेक्षा ७ पट अधिक गतीने संसर्ग होतो .
८.दिल्लीमध्ये कोरोनाचा वाढता फैलाव पाहता दिल्लीतील निर्बंध अधिक कठोर करण्यात आले असून तेथील सर्व खाजगी कार्यालये केवळ अत्यावश्यक सेवा वगळता बंद ठेवण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत .दिल्लीत कोरोनाचा संसर्ग दर २५ टक्क्यांवर पोहोचला आहे.
No comments:
Post a Comment