इतिहासात डोकावताना -
*जन्म -
- १८७१-श्रीपाद कोल्हटकर मराठी नाटककार, विनोदकार, व वाङ्मय समीक्षक.
- १८९३-प्रशांत महालनोबीस भारतीय संख्या शास्त्राचे जनक
*मृत्यु-
- 2000-वासुदेव बेलवलकर - प्रसिद्ध ऐतिहासिक कादंबरीकार.
*चालू घडामोडी -२९ जून २०२१ -
१. आज भारतीय संख्य्शास्त्राचे जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रशांत महालनोबीस यांची जयंती आहे २९ जून १९८३ ला त्यांचा जन्म झाला होता .स्वातंतत्र्योतर काळात देशाच्या आर्थिक नियोजनात त्यांचे मोठे योगदान होते .मानववंश शास्त्र,जीवशास्त्र ,हवामानशास्त्र यातील सैद्धांतिक प्रश्न त्यांनी संख्या शास्त्राने सोडवले .१९५० साली राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण संस्तेची स्थापना केली .संयुक्त राष्ट्राच्या १९४७-ते५१ दरम्यान नमुना निवड उप आयोगाचे ते अध्यक्ष होते.१९६८ मध्ये त्यांना पद्मविभुषन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते .२८ जून १९७२ मध्ये त्यांचे निधन झाले .
२.मुंबई महानगरपालिका व I.D.E Water Technologies LTD कंपनी दरम्यान नि:क्षारीकरण प्रकल्पाचा अहवाल तयार करण्याचा सामंजस्य करार करण्यात आला आहे .मालाडमधील मनोरी येथे हा प्रकल्प उभारला जाणार आहे .इस्त्रायली तंत्रज्ञानाद्वारे समुद्राच्या क्षारयुक्त खर्या पाण्याला गोड पाणी बनवण्याचा हा प्रकल्प आहे .मनोरी येथील २०० दशलक्ष लिटर पाण्याचे नि:क्षारीकरण करण्यात येईल.मी २०२२ पर्यंत याचे डीपीआर तर २०२५ पर्यंत हा प्रकल्प सुरु होऊ शकतो .
3.महाराष्ट्र राज्यामधील जिल्हा परिषद मधील गट क रिक्त पदे भरण्याबाबतची कार्यवाही पुढे ढकलण्यात आलच आदेश राज्याच्या ग्रामविकास विभागाने काढला आहे .मराठा आरक्षण कायदा रद्द झाल्याने व अनुकंपा तत्वावरील नोकर भरतीचे प्रमाण वाढविण्यात आल्यामुळे ही कार्यवाही पुढे ढकलली आहे .
४..जेष्ठ पत्रकार पी.साईनाथ यांना फ़ुकुआओ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे .ग्रामीण भारतावरील माहितीचे नवे स्वरूप आपल्या लेखन शैलीतून मांडले आहे .आशिआइ संस्कृतीबाबत जागरूकता वाढवण्यासाठी त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे .हा पुरस्कार मिळवणारे ते १२ वे भारतीय व्यक्ती बनले आहेत .
५..'अरर्र्हरीकुम माख्तुम्म' या जागतिक पातळीवर गाजलेल्या प्रेषित चरित्र ग्रंथाचे मराठी भाषांतर करणारे जेष्ठ साहित्यिक डॉ.मीर इसहक यांचे निधन .
6.ओसियेक (क्रोएशिया)आयएसएफ जागतिक नेमबाजी स्पर्धेत २५ मीटर पिस्तुल स्पर्धेत भारताच्या राही सरनोबत हिने सुवर्णपदक पटकावले आहे .
७.भारताची स्टार तिरंदाज खेळाडू दीपिका कुमारी विश्व तिरंदाज मध्ये अव्वल स्थानी पोहचली आहे .
८..ओसियेक (क्रोएशिया)इथे होत असलेल्या नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत २५ मीटर पिस्तुल प्रकारात महाराष्ट्राच्या राही सरनोबत ने सुवर्णपदक पटकावले आहे .या विश्व्चषकातील हे भारताचे पहिले सुवर्णपदक ठरले .
९.t २० विश्वचषक क्रिकेट स्पर्धा संयुक्त अरब अमिराती मध्ये होणार असल्याचे बीसीसीआयने जाहीर केले आहे .ही स्पर्धा भारताच्या यजमानतेत संयुक्त अरब अमिराती मध्ये होणार असल्याची माहिती बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी दिली आहे .
१०.केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी १ लाख १० हजार कोटी रुपयांची कर्ज हमी योजना जाहीर केली आहे.कोरोन स्न्क्ताने ग्रासलेल्या क्षेत्रांना दिलासा देण्याचा या योजने द्वारे प्रयत्न करण्यात आला आहे .या योजने अंतर्गत आरोग्य क्षेत्राला ५०००० कोटी तर पर्यटन क्षेत्रासह इतर क्षेत्राला ६० हजार कोटी रुपयांच्या कर्ज हमी जाहीर करण्यात आली आहे .
No comments:
Post a Comment