चालू घडामोडी 24 जून-
1.मुंबई उच्च न्यायालयात चार नव्या अतिरिक्त न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आली आहे.राजेश लड्डा,शिवकुमार डिगे,संजीव मेहरे,गोविंद सानप याना उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे.
2.महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला आयएसओ प्रमाणपत्र मिळाले आहेत.
3.मुडीज इन्व्हेस्टर्स सर्व्हिसेसने 2021 वर्षांमधील भारताचा ऋद्धिदराचा अंदाज खाली आणताना 13.9टक्के वरून 9.6टक्के व्यक्त केला आहे.मायक्रोइकॉनॉमिक्स इंडिया इकॉनॉमिक्स शोक्स फ्रॉम सेकंड कोविड व्हेव या शीर्षकाखाली प्रसिद्ध केलेल्या अहवालात हे स्पस्ट करण्यात आले आहे.
4.सौर डागांवरील 100 हुन अधिक सौरज्योतीची निरीक्षणे मिळवण्यात इस्रोला पहिल्यांदाच यश मिळाले आहे.चांद्रयान 2 या अवकाश मोहिमेचे निष्कर्षामध्ये हे स्पध्तबझाले आहे.
5.जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताला नमवून न्यूझीलंड बनले पाहिले कसोटी चॅम्पियन.
6.आयसीसीने जरी केलेल्या कसोटी क्रिकेट क्रमवारीत अष्टपैलू खेळांडूनमध्ये भारताचा रवींद्र जडेजा प्रथम स्थानी.
7.भारतातील बहुतांश लोकांचा मुद्रित माध्यमांवर जास्त वि1श्वास असल्याचे स्पष्ट झाले आहे.रॉयटर्स इन्स्टिट्यूट फॉर द स्टडी ऑफ 46 देशांमध्ये संशोधन केले होते .जगभरातील 65 टक्के लोकांनी माध्यमातील बातम्यांवर विश्वास दाखवला आहे ,या क्रमवारीत फिनलंड आघाडीवर आहे.
8.युगांडा देशामध्ये नरबळी विरोधी कायदा मंजूर झाला आहे,महाराष्ट्रातील अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे याला सहकार्य लाभले आहे.या कायद्यानुसार मृत्युदंडाची शिक्षा होऊ शकते.
9.खाद्यतेलांच्या किमतीत घट.30 रुपयांनी आली कमी,केंद्राने आयात वाढवल्याचा परिणाम.
No comments:
Post a Comment