Wednesday, June 23, 2021

चालू घडामोडी २३ जून

###इतिहासात डोकावताना ###

*मृत्यु -

१९५३-भारतीय जनसंघाचे संस्थापक व शिक्षणतज्ञ शामाप्रसाद मुखर्जी .

१९७५-भारतीय भूसेना प्रमुख  जनरल प्राणनाथ थापर  

*चालू घडामोडी -

१.कोरोनाच्या डेल्टा प्लस या वेरींत्चे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत .देशामध्ये आतापर्यंत २२ रुग्णांना या विषाणूची लग्न झाली आहे.त्यातील सोळा महाराष्ट्रातील तर इतर केरळ व मध्यप्रदेशमधील आहेत.अमेरिका ,जपान,भारत,नेपाल,पोर्तुगालचीन,इंग्लंड,स्वित्झर्लंड मध्ये हा विषाणू चे संक्रमण आढळले आहे .

२.महाराष्ट्र राज्यात लसीकरणाचा उच्चांक नोंदवण्यात आला आहे .एकाच दिवशी ५ लाख ५२ हजार नागरिकांना लस देण्यात आली आहे .आतापर्यंत राज्यात २ कोटी लोकांचे लसीकरण करण्यात आले आहे .

३.आरोग्य ,कुटुंब कल्याण विभागाच्या मदतीने आयसीएमआर महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यांमध्ये सेरो सर्वेक्षण करत आहे .बीड,नांदेड,परभणी,जळगाव,अहमदनगर या सहा जिल्ह्यांचा या जिल्ह्यांमध्ये हे चौथे सेरो सर्वेक्षण सुरु करण्यात आले आहे .या सर्वेक्षणात ३ हजार नमुने घेण्यात येणार आहेत .कोरोना  विषाणू विरुद्ध लढण्यासाठी आवश्यक प्रतिपिंड (antibodies)तयार होतात.सेरो सर्वेक्षणात विषाणूचा विस्तार किती प्रमाणात झाला आहे याचा शोध लावण्यात येतो .

४.महाबळेश्वरच्या परिसरातील वटवाघळांच्या दोन प्रजातीमध्ये 'निपा'हा विषाणू आढळून आल्या बाबतचा NIV पुणे येथील शास्त्रज्ञांचा शोध २०२० मढील शोध निबंध प्रकाशात आला आहे .

५.भारत बायोटेक ने विकसित केलेली कोव्य्क्सीन हि स्वदेशी लस ७७.८ टक्के प्रभावी असल्याचे तिसर्या चाचणी नंतर समोर आले आहे .भारतीय औषध महानियंत्र्काकडे कंपनीने मंजुरीसाठी हा अहवाल सादर केला आहे.

६.भारतीय जलतरण महासंघाकडून श्रीहरी नटराज व मना पटेल यांनी विशेष स्थानान्द्वारे टोकिओ ऑलिम्पिक साठी नामांकन अर्ज दाखल केले आहे .

७.संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सरचिटणीसपदी अन्तिनिओ गुटेर्स यांची फेरनिवड करण्यात आली आहे .ते संयुक्त राष्ट्र संघाचे नववे सरचिटणीस बनले आहेत .

८.अमेरिका जागतिक स्तरावर आशिआइ देशांना ५.५ कोटी लसी देणार असल्याची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी केली आहे .

९.फ्लोरिडाच्या डायटेना बीचजवळ अमेरिकेच्या नौदलाने विमानवाहू जहाजद्वारे 18 हजार किलोच्या बॉम्बची चाचणी समुद्रात घेण्यात आली.

No comments:

Post a Comment