##इतिहासात डोकावताना##
चालू घडामोडी 18जून
1.महाराष्ट्राच्या समुद्रकिनाऱ्यावर कासव संवर्धन कार्यास यश येत आहे.2019-20 पेक्षा 20-21मध्ये कासवांच्या घरट्यांमध्ये वाढ झाली आहे.
2.महाराष्ट्र राज्य शिक्षण विभागाने जारी केलेल्या नव्या निर्णयानुसार एखाद्या विद्यार्थ्याला नववी दहावीत प्रवेश घ्यायचा असेल तर तो शाळा सोडल्याचा दाखल्याविना मिळू शकेल.
3.मुंबई सह काही जिल्ह्यांसाठी साप्ताहिक लसीकरण योजना लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची महिती उच्च न्यायालयामध्ये राज्य सरकारने दिली आहे.
4.औषध उत्पादनावरील स्वयंपूर्णतेसाठी केंद्र सरकारने पीएलआय ही योजना लागू केली आहे.
15 हजार कोटी रुपयांची ही योजना आहे याअंतर्गत पुढील पाच वर्षांमध्ये औषधांची विक्री वाढविणाऱ्या कम्पन्यांना या योजनेद्वारे 4 ते 10 टक्क्यांपर्यंत प्रोत्साहन पर रक्कम देण्यात येणार आहे.
5अमेरिकेच्या नोवव्यक्स कंपणीने विकसित केलेली कोरोना प्रतिबंधक लस भारतामध्ये सप्टेंबर पर्यंत उपलब्ध होऊ शकते.सिरम इन्स्टिट्यूट ने या कम्पनिशी करार केला आहे त्यानुसार भारतामध्ये ही लस कोवाव्याक्स नावाने ओळखली जाईल.
6.सीबीएसई चा 12 विचा निकाल 31 जुलै पर्यंत जाहीर होणार आहे.
7.सीमा रस्ते संघटनेच्या वतीने (BRO)बांधण्यात आलेल्या 12 रस्त्यांचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते देशाला समर्पित करण्यात आले.
8.जगातील सर्वात मोठी सॉफ्टवेअर कम्पनी मायक्रोसॉफ्ट च्या अध्यक्षपदी मायक्रोसॉफ्ट चे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नाडेला यांची निवड करण्यात आली आहे.
9.बोत्सवाना च्या खाणीत 1098 कॅरेटचा जगातील तिसरा सर्वात मोठा हिरा सापडला आहे.
10.भारत व न्यूझीलंड या दोन देशांच्या क्रिकेट संघांमध्ये आजपासून इंग्लंड येथे जागतिक कसोटी अजिंक्यपद (WTC)स्पर्धेच्या अंतिम सामन्याची लढत होणार आहे.
No comments:
Post a Comment