Wednesday, June 16, 2021

चालू घडामोडी 16जून

 


##इतिहासात डोकावताना##

जन्म-

1920-प्रसिद्ध गायक व संगीतकार हेमंतकुमार मुखोपाध्यय

1994-गायिका आर्या आंबेकर 

मृत्यू-

1925-कायदेपंडित चित्तरंजन दास

1977-गायक श्रीपाद गोविंद नेवरेकर 


चालू घडामोडी 15जून 

1.जेष्ठ पत्रकार व राजकीय विश्लेषक प्रताप आसबे यांना पत्रकार  दिनू रणदिवे स्मृती पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.


2.वर्ल्ड सायंटिस्ट अँड युनिव्हर्सिटी रँकिंग 2021 मध्ये पुण्यातील डी .वाय.पाटील विद्यापीठाच्या 48 संशोधकांना जागतिक मानांकन मिळाले आहे.


3.जेष्ठ अभिनेता चंद्रशेखर यांचे निधन.


4.सोन्याच्या दागिन्यांवर्ती हॉल मार्क बंधनकारक करण्यात आले आहे.केंद्र सरकारच्या नव्या नियमावलीनुसार देशभरातील ज्वेलर्स आता केवळ 14 ,18 व 22 क्यारेट सोन्याच्या वस्तू विकू शकतात.

  

5.कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना जास्त फटका बसण्याची शक्यता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने फेटाळून लावली आहे.


6.श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय संघाचे मुख्य  प्रशिक्षक म्हणून भारताचे माजी फलंदाज राहुल द्रविड यांची निवड करण्यात आली आहे.


7.रिजर्व बँक ऑफ इंडियाने संस्थांवरील नियमनसंबंधी धोरणांचा आढावा घेण्यासाठी प्रस्ताव सादर केला आहे याची अमलबजावणी झाल्यास मायक्रो फायनान्स संस्थांवरील व्याजदराबाबतचे निर्बंध संपुष्टात येतील.


8.भारतीय अर्थव्यवस्था कोरोनामुळे जरी डळमळीत झाली असली तरी प्रत्यक्ष कर संकलनामध्ये 66 टक्के एवढी वाढ नोंदवण्यात आली आहे.


9.21 जूनपासून होत असलेल्या 18 वर्षांच्या पुढील व्यक्तीच्या लसीकरणासाठी आता कोविन यापवर रजिस्टर करणे सक्तीचे नसणार आहे. प्रत्यक्षात नोंदणी करूनही लस घेता येणार आहे.


10.युरो फुटबॉल कप स्पर्धेमध्ये 11 गोल नोंदवत पोर्तुगालच्या ख्रिस्तीयानो रोनाल्डो याने विक्रम रचला आहे.










No comments:

Post a Comment