##इतिहासात डोकावताना##
जन्म-
1898-शिक्षणतज्ज्ञ डॉ.ग.श्री.खरे
1933-सरोजिनी वैद्य-मराठी लेखिका
1938-समाजसेवक-अण्णा हजारे (किसन बाबू हजारे)
मृत्यू-
1931-संदेशकार-अच्युत कोल्हटकर
1971-नोबल पारितोषिक विजेते अमेरिकी जिवशास्त्रज्ञ वेंडेल स्टॅनले.
*1667-पहिल्यांदा डॉ जॉ बाप्टिस्ट डेनिस ने मानवास दुसऱ्या मानवाचे रक्त दिले.
*1752-बेंजामिन फ्रँकलिन याने आकाशातील वीज ही वीज असल्याचे सिद्ध केले.
चालू घडामोडी 15जून
1.महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील रखडलेल्या भरती प्रक्रिया पुन्हा सुरू करताण मराठा समाजसाठीच्या SEBC प्रवर्गातील पदे EWS प्रवर्गातून भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे व याबाबतचा आदेश ग्रामविकास विभागाने काढला आहे.
2.जेष्ट मुद्रितशोधक,वाचन चळवळीचे कार्यकर्ते नारायण बांदेकर यांचे निधन.
3.महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सीबीआयने भ्रष्टाचार प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे ,हा गुन्हा रद्द व्हावा यासाठी देशमुख यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती,ही याचिका रद्द करण्यात यावी अशी मागणी सीबीआयने न्यायालयास केली आहे व अनिल देशमुख यांच्यावरील भ्रष्टाचार आरोपांच्या चौकशीसाठी राज्य सरकारची परवानगी गरजेची नाही अशी माहिती सीबीआयने उच्च न्यायालयाला दिली.
4.मुंबई विद्यापीठामध्ये आंतरराष्ट्रीय संबंध आणि सामरिक अध्ययन विभाग सुरू करण्यात आला आहे.याचे उदघाटन लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी केले.बदलत्या परिस्थितीनुसार परराष्ट्रीय धोरण व आंतरराष्ट्रीय संबंधांवर सखोल अभ्यास होणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी मांडले.
5.मे महिन्यामध्ये घाऊक किंमततीवर आधारित महागाई दर 12.94 टक्क्यांवर पोहचला आहे.निर्देशांक अस्तित्वात आल्यापासूनचा हा सर्वाधिक निर्देशांक ठरला आहे.
6.देशातील कुठल्याही भागात स्थलांतरित झालेल्या मजुरांना त्याच्याकडे असणाऱ्या रेशन कार्डवरून योग्य किमतीत धान्य मिळवले व त्यांना अन्नसुरक्षा लाभावी हे 'एक देश एक रेशन कार्ड 'योजनेमागचे उद्दिष्ट असल्याचे केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात सांगितले आहे.
7.घरोघरी जाऊन लसीकरण करणे हा राष्ट्रीय धोरणाचा भाग नसल्याची माहिती केंद्र सरकारने उच्च न्यायालयात दिली आहे.
8.कोव्याकसीन या लसीच्या डोसची 6 ते 12 वयोगटातील लहान मुलांवर चाचणी करण्यास दिल्ली येथे आजपासून
निवडप्रक्रिया सुरू होत आहे.
9.इस्रायल मध्ये सत्तांतर झाले आहे.12 वर्षांनंतर हे सत्तांतर झाले आहे.इस्त्राईल चे पंतप्रधान बेंजामिन न्यातन्याहू यांचा पराभव करत नफटली बेनेट इस्त्राईल चे पंतप्रधान बनले आहेत.
10.जागतिक टेनिस क्रमवारीत प्रथम स्थानी असणाऱ्या नोवाक जोकोविचने फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या एकेरी स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.त्याच्या कारकिर्दीतील हे 19 वे ग्रँडस्लॅम ठरले.
No comments:
Post a Comment