*चालू घडामोडी 08 जून
##इतिहासात डोकावताना##
*जन्म-1910-मराठी समीक्षक दिनकर केशव बेडेकर
1917-संगीतकार व भावगीत गायक गजाननराव वाटवे
* आज जागतिक समुद्र दिन .
१.१९४८ ते २०२१ या दरम्यान महाराष्ट्राची लाल परी एसटी चा ७३ वर्षांचा प्रवास कसा राहिला ,काय काय बदल करण्यात आले या सर्वाची माहिती आता विवध सामाजमाध्य्माद्वारे (फेसबुक इंस्ताग्राम,टेलिग्राम )''वाहननामा ''या सदरामधून उपलब्ध होणार आहे .
२.सर्वोच्च ,उच्च न्यायालयामधील सुनावणीच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण नागरिकांना पुढील येत्या काळामध्ये पाहता येऊ शकेल .याबाबत न्या.धनंजय चंद्रचूड यांच्या ई -समितीने प्रारूप नियमांचा मसुदा जाहीर केला .
३.इस्त्रो (इंडिअन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन )च्या वैज्ञानिकांनी तीन प्रकारची श्वसनयंत्रे तयार केली आहेत .याचे तंत्रज्ञान हस्तांतरण उद्योगांना लवकरच करण्यात येणार आहे .यातील एका यंत्राचे नाव प्राण (प्रोग्रामेबल रेस्पिरेटरी असिस्टनन्स फॉर दि निडी एड)व दुसर्या यंत्राचे अंबू (आरटीफ़िशिअल म्यानुअर ब्रीदिंग )असे आहे.
४..२१ जूनपासून देशातील १८ ते ४५ वर्षांमधील नागरिकांसाठी कोरोना प्रतिबंधक लस मोफत देणार असल्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केली .
५.प्राप्तीकर विवरणपत्र दाखल करण्यासाठी प्राप्तीकर(Income Tax Return ) विभागाने नवीन पोर्टल सुरु केले आहे .
६.नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA)व राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (NRC)बाबत अभ्यास करणाऱ्या मंत्रिमंडळ उपसमितीला अहवाल सादर करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे ,त्यानुसार या समितीला आता ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंत अहवाल सादर करता येईल.
७.WTC(World Test Championship)च्या अंतिम सामन्यामधील ''फॉलोऑन" नियमाबाबत अंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC)ने घोषणा केली आहे .आयसीसीच्या फॉलोऑन कलम १४.११ नुसार प्रथम फलंदाजी करणाऱ्या करणाऱ्या संघाला २०० धावांची आघाडी मिळाल्यास प्रतिस्पर्धी संघाला फलंदाजीसाठी बोलावले जाऊ शकते .पहिल्या व दुसर्या दिवशी खेळ न झाल्यास कलम १४.१ खेळाच्या प्रारंभापासून उर्वरित दिवसांच्या संख्येनुसार लागू होईल .
८.आएपिएल (Indian Premier Leage)चे उर्वरित सामने १९ सप्टेंबर पासून युएइत खेळवले जाणार असल्याचे बिसिसीआयने जाहीर केले .२९ सामन्यांचा खेळ झाल्यांनतर भारतातील वाढत्या कोरोन संक्रमण पार्श्वभूमीवर आएपिएल स्थगित करण्यात आले होते.
९.फिफा विश्वकप २०२२ व आशिआइ कप २०२३ च्या संयुक्त क्वालीफायर स्पर्धेत भारताने बांगलादेश २-० असा पराभव केला .
१०.amezon चे संस्थापक जेफ बेझोस ब्लू ओरिजिनल क्याप्सूल या त्यांच्या अंतराळ कंपनीच्या रॉकेट मधून अवकाशात उड्डाण करणार आहेत .
No comments:
Post a Comment