Thursday, March 4, 2021

चालू घडामोडी 04.03.2021

*राज्य -


१. ५० टक्यांच्या वरती आरक्षण नेता येणार नाही असा निर्वाळा देत सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र स्थानीक  स्वराज्य संस्थेचा जिल्हा परिषद कायद्याचे कलम १२ ठरवले रद्द .त्यामुळे काही ठिकाणी जिल्हा परिषदेची पुन्हा निवडणूक होण्याची शक्यता आहे .



२.राज्यामध्ये "बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक सन्मान" योजना राबवण्यास सुरुवात .या योजने  अंतर्गत राज्यातील माजी सैनिक व दिवंगत माजी सैनिकांच्या पत्नींना मिळकत कर माफ करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे.


*राष्ट्रीय-

३.केंद्र सरकारने कोरोनाच्या लासिकर्नावरील वेळेची मर्यादा हटवली आहे .आता लसीकरण २४ तास चालू राहणार आहे .याआधी सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत वेळेची मर्यादा होती .



४.महानगर टेलिफोन निगम लिमिटेड (MTNL )या कंपनीची देशभरातील मालमत्ता व जमिनीचा येत्या काही दिवसांमध्ये सरकार लिलाव करणार आहे .



५.'पत्नी हि पतीची खाजगी मालमत्ता नाही ,तसेच जबरदस्तीने  पतीसोबत राहण्यास तिला सांगितले जाऊ शकत नाही ,असा निर्वाळा सुप्रीम कोर्टाने एका पोटगीच्या खटल्याच्या सुनावणीवेळी दिला आहे .



६.''ग्रामीण भागातील लोक व शेतकरी यांनी fastag ची अमलबजावणी करण्याची अपेक्षा सरकार कशी करू शकते " असा सवाल सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला विचारला आहे.ग्रामीण भागातील लोक व शेतकरी यांमध्ये शैक्षणिक प्रगतीचा शहरी   लोकांच्या तुलनेने अभाव असल्याचे जास्ती करून आढळून येते .  केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयास येत्या १० मार्च पर्यंत उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत .

7. लोकसभा व राज्यसभा यांचे विलीकरण करण्यात आले आहे व आता हे एकत्रितरीत्या संसद टीवी म्हणून ओळखले जाणार आहे .


  

*अंतरराष्ट्रीय -


८.. व्हाईट हाउसच्या मिलिटरी ऑफिसचे मार्गदर्शक म्हणून भारतीय अमेरिकन माजू वर्घीज  यांची  जो बायडेन सरकारने निवड केली आहे .









*संपर्क -sankalponline0@gmail.com

*संकल्प डिजिटल फोटोझ &मल्टी सर्विसेस

*sankalponlineworks आता  TELEGRAM वरही उपलब्ध 

##Folow us on facebook,telegram&instagram@sankalponlineworks










No comments:

Post a Comment