*राज्य -
१.देशातील राहण्यासाठी योग्य शहरांची यादी केंद्र सरकारच्या मंत्रालयाने जाहीर केली आहे .या यादीनुसार देशातील इलेक्ट्रिक शहर म्हणून ओळख असणारे कर्नाटकातील बंगरूळ शहर हे देशामधून पहिल्या स्थानावर आहे .त्यापाठोपाठ महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी,व विद्येचे माहेरघर म्हणून ओळख असणारे पुणे" शहर दुसऱ्या स्थानी आहे.पहिल्या दहा शहरांमध्ये महाराष्ट्रातील एकूण तीन शहरांना स्थान मिळाले आहे .
2.नाशिक जिल्ह्यातील उद्योजक सुधीर मुतालिक यांची CII (The confederation of indian industries )महाराष्ट्र डिविजन चे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलि आहे .
*राष्ट्रीय-
३.राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी खडकवासला (NDA)च्या उपप्रमुखपदी रिअर एडमिरल संजय वस्त्सायान यांची नियुक्ती झाली आहे .
४.कोरोनामुळे देशभरात लावण्यात आलेल्या टाळेबंदी मुळे देशभरातील १५ लाख शाळा बंद होत्या व या गोष्टीमुळे देशभरातील माध्यमिक व प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या २४ कोटी ७० लाख विद्यार्थ्यांवर झाला असे युनिसेफने त्यांच्या अहवालामध्ये म्हटले आहे .''शाळा बंद असल्या तरी online शिक्षण सुरु होते ,मात्र online शिक्षण हे पर्याय ठरू शकत नाही असे युनिसेफ्च्या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे ''.डिजिटल शिक्षण घेताना ४ पैकी केवळ १ विद्यार्थ्याकडे डिजिटल शिक्षण घेण्याकरिता आवश्यक साधने असतात.असे अहवालात मांडण्यात आले आहे .
जाणून घेऊयात युनिसेफ बद्दल-
*युनिसेफ हि संयुक्त राष्ट्र संघटना (UNITED NATION)चा भाग आहे .
*युनिसेफचा मराठीमध्ये संयुक्त राष्ट्रे बाल निधी असे म्हणतात .
*स्थापना -११ डिसेंबर १९४६
दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये जन्मलेल्या बालकांना आपत्कालीन अन्न व आरोग्य सेवा पुरवण्याकरिता या फंडची स्थापना करण्यात आली होती .
याचे संस्थापक म्हणून पोलिश डॉक्टर लुडविक राज्च्मान यांना ओळखले जाते. १९५० मध्ये या संस्थेच्या नावामधील EMERGENCY व INTERNATIONAL हे शब्द काढून टाकण्यात आले व युनिसेफला विकसनशील देशांमधील महिला व बालकांच्या गरजा पूर्ण करण्याचा आदेश संयुक्त राष्ट्र संघटनेने दिला . १९५३ मध्ये युनिसेफ संयुक्त राष्ट्र संघाचा कायम स्वरूपी एक भाग बनले .
*अंतरराष्ट्रीय -
५.श्रीलंका येथे सुरु असलेल्या श्रीलंका व वेस्ट इंडीज दरम्यान सुरु असलेल्या T20 क्रिकेट मालिकेच्या पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजचा फलंदाज केरोन पोलार्ड याने श्रीलंकेचा अखिल धनंजय याच्या ओवरमध्ये ६ सिक्स लगावत १४ वर्षे जुन्या युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी साधली .वेस्ट इंडीज संघातर्फे t २० अंतरराष्ट्रीय मध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे .
६.इटलीमध्ये पोम्पेई या शहरामध्ये संशोधकांनी केलेल्या एका उत्ख्नानामधे चार चाकांचा २००० वर्षांपूर्वीचा एक अलिशान 'रथ' सापडला आहे .
७.उद्योजक एलन मस्क यांची स्पेस -X या कंपनीचे नवे व सर्वात मोठे असणारे ROCKET तिसऱ्या चाचणीमध्ये अयशस्वी ठरले आहे .
*काही माहिती हवी असल्यास 'COMMENT BOX ' मध्ये विचारू शकता किवा खाली दिलेल्या मेल आयडीवर संपर्क साधावा ,व दररोज अशाच चालू घडामोडी वाचण्याकरिता SUBSCRIBE नक्की करा !!
*संपर्क -sankalponline0@gmail.com
*संकल्प डिजिटल फोटोझ &मल्टी सर्विसेस
##Folow us on facebook,telegram&instagram@sankalponlineworks





No comments:
Post a Comment