*राज्य-
1.महाराष्ट्रामध्ये दुर्मिळ होत चाललेल्या काळ्या पंखाच्या कोकिळाचे वास्तव्य यवतमाळच्या चौसाळ्याच्या जंगलांमध्ये आढळून आले यवतमाळ येथील प्राध्यापकला पक्षी निरीक्षण दरम्यान या कोकिळाचे अस्तित्व आढळून आले
2.पंडित भीमसेन जोशींच्या नावाने आता केंद्र सरकारचे आकाशवाणी संगीत संमेलन आयोजित केले जाणार असल्याची घोषणा केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जवडेकरांनी केली.पंडित भीमसेन जोशी यांच्या नावाने आता शास्त्रीय संगीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला शिष्यवृत्तीची दिली जाणार आहे.
![]() |
| P.bhimsen joshi |
*राष्ट्रीय -
1.अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे माजी अध्यक्ष श्री र.ग.कर्णिक यांचे निधन.
2. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाची नवीन प्रारूप अधिसूचना जारी यानुसार "ड्राइविंग लायसेन्स" साठी आता "ड्राइविंग ट्रेनिंग सेंटर" मधून प्रशिक्षण घेतलेल्या चालकाला ड्राइविंग टेस्टची आवश्यकता नसणार असल्याचे स्पष्ट होते.
आंतरराष्ट्रीय-
1.ज्यो रूटचे त्याच्या शंभराव्या कसोटीमध्ये द्विशतक.अस करणारा तो पहिलाच क्रीकेटपटू ठरला आहे.भारत विरुद्ध इंग्लंड यांच्या दरम्यान सुरू असलेल्या कसोटीमध्ये त्यांनी हा विक्रम केला.यापूर्वी शंभराव्या कसोटी सामन्यात सर्वात जास्त रन्स करण्याचा विक्रम हा पाकिस्तानच्या इंजमाम उल हकच्या नावे होता.
![]() |
| Joe root |
2.आता कम्प्युटर मेंदूद्वारेही ऑपरेट करता येणार असल्याची घोषणा टेस्ला ग्रुपचे अध्यक्ष व प्रसिद्ध उदयोगपती 'एलन मस्क' यांनी घोषणा केली.एलन मस्क सध्या एका आशा प्रकल्पावर काम करत आहेत की ज्यामध्ये मेंदूमध्ये चिप बसवण्यात येणार आहे व त्याद्वारे व्यक्ती कॉम्प्युटर ऑपरेट करू शकेल ,एलन यांच्या म्हणण्यानुसार जर सगळं व्यवस्थित झाले तर या वर्षाच्या शेवटी मानवी ट्रायल सुरू होऊ शकते.
![]() |
| Elan musk |




No comments:
Post a Comment