Friday, February 19, 2021

 *आंतरराष्ट्रीय
1.-अमेरिकण लसीचे आता भारताच्या सीरम इन्स्टिट्यूट  मध्ये उत्पादन होणार आहे.अमेरुकेतील औषध उत्पादक कंपनी "Novavax" कंपनीची  "Novavax" नावाच्या   लसीचे सिरम इन्स्टिट्यूट उत्पादन 
करणार आहे .ही लस दक्षिण आफ्रिकेतील कोरोना विशानुवर प्रभावी ठरत आहे.



2.पाकिस्तान चे पंतप्रधान" इम्रान खान "यांचे श्रीलंका येथील संसदेमधील पुढच्या आठवड्यात होणारे नियोजित भाषण रद्द केले गेले आहे.कोरोना च्या निर्बंधांमुळे हे भाषण  रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले असले तरी इम्रान भारत पाक तसेच कश्मीर  संबंधावर बोलणार असल्यामुळे रद्द केल्याचे बोलले जात आहे.




*राष्ट्रीय

1.दहावी परिक्षे नंतर विद्यार्थ्यांचा कल जाणून घेण्यासाठी असणारी कल चाचणी रद्द केल्यानंतर आता शिक्षण विभाग विद्यार्थ्यांकरीता एक aptitude टेस्ट घेण्याच्या तयारीत आहे.aptitude, interest, intelligence तसेच personality च्या आधारे ही टेस्ट होणार आहे.ही परीक्षा विद्यार्थ्यांसाठी ऐच्छिक स्वरूपात असणार आहे.




2."ख्रिस मॉरिस" आयपीएल मधील आतापर्यंतचा सर्वात जास्त  बोली लागलेला खेळाडू ठरला आहे.राजस्थान रॉयल्सने 16 कोटी 25 लाख रुपयांची बोली लावत संघात दाखल करुन घेतले.




3.राज्य सरकारच्या सेवेतील नोकर भरती आता (महाराष्ट्र लोकसेवा आयोग)MPSC मंडळाद्वारे होण्याची शक्यता आहे.सध्या MPSC द्वारे वर्ग 1 आणि वर्ग 2 ची निवड केली जाते,अराजपत्रित ब ,क व ड या पदांची भरती ही दुययं सेवा मंडळातर्फे केली जात आहे.




4.महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प 8 मार्च रोजी सादर करण्याचा निर्णय विधिमंडळ सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे.विधिमंडळाचे अर्थ संकल्पिय अधिवेशन हे 1 मार्च पासून मुंबईत होणार आहे.









No comments:

Post a Comment