1.इंग्लंड विरुद्धच्या कसोटीमध्ये भारत विजयी झाला.या विजयासह जागतिक कसोटी अजिंक्य स्पर्धेत भारत दुसऱ्या स्थानी पोहचला आहे,आता न्यूझीलंड प्रथम स्थानी तर ऑस्ट्रेलिया तृतीय स्थानी आहे.
2.पीएफ वरील व्याजदर आणखीन घटनार आहे.याचा मोठा फटका वेतनदारांना बसू शकतो.
3.भारतीय उपखंडाची भूपृष्ठरचना 57 कोटींपेक्षा जुनी असण्याचा अंदाज शास्त्रज्ञांनी व्यक्तकेलाआहे.भीमबेटका येथील गुंफांमध्ये "डिकनसोनिया " हा जीवष्म आढळला आहे.हा जीवष्म याआधी केवळ युक्रेन,रशिया व चीनमध्ये आढळला आहे.
4.ott प्लॅटफॉर्म वर बंदी घालण्याबाबत दाखल सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयासमोर केंद्र सरकारची भूमिका मांडताना महाधिवक्ता नि केंद्र ott प्लॅटफॉर्म वरती नियंत्रण ठेवण्यासाठी विचाराधीन असल्याचे सांगितले आहे.
5.दिल्ली येथील शेतकरी आंदोलनातील हिंसाचार प्रकरणी दोन आरोपींना दिल्ली येथील अतिरिक्त स्तर न्यायालयाने जमीन दिला आहे.तसेच सुनावणी दरम्यान केंद्राने शेतकऱ्यांवर दाखल केलेल्या देशद्रोहाचा गुन्ह्याबद्दल "असंतुष्टांचा आवाज दाबण्यासाठी देशद्रोहाचा गुन्हा लावता येणार नाही अशा शब्दात न्यायालयाने केंद्रास सुनावले".



No comments:
Post a Comment