Sunday, January 31, 2021

पद्म पुरस्कार म्हणजे काय ?? व २०२१ या वर्षी पद्म पुरस्कार विजेते कोण जाणून घ्या !!!

*पद्म पुरस्कार -


 पद्म पुरस्कार हा भारत शासनाद्वारे देण्यात येणार सर्वोच्च नागरी पुरस्कारापैकी एक आहे. हा पुरस्कार सर्वोच्च नागरी पुरस्कारांमध्ये क्रमांक दोनचा पुरस्कार आहे. आपल्या प्रजासत्ताकदिनाच्या एक दिवस आधी या पुरस्कार विजेत्यांच्या नावाची घोषणा करण्यात येते व मार्च-एप्रिल महिन्यांदरम्यान या पुरस्काराचे वितरण करण्यात येते. राष्ट्रपतींची सही असलेले सन्मानपत्र व सन्मान पदक असे एकंदरीत या पुरस्काराचे स्वरूप असते. 1954 मध्ये भारत सरकारने भारतरत्न व पद्म पुरस्कारांची निर्मिती केली .पद्म पुरस्कार तीन वर्गात विभागून दिले जात .8 जानेवारी 1955 पासून राष्ट्रपतींच्या अधिसूचनेनुसार या तीन वर्गांना पद्मविभूषण,पद्मभूषण,पद्मश्री ही नावे देण्यात आली. 


*पद्म पुरस्काराचे तीन वर्ग पडतात ते खालीलप्रमाणे - 

                                                     १.पद्मविभूषण 



1.पद्मविभूषण -पद्मविभूषण हा भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी सन्मान पुरस्कार आहेच पुरस्कार सामाजिक ,शैक्षणिक,किंवा इतर क्षेत्रामध्ये असामान्य कार्य करणाऱ्या व्यक्तीस देऊन तिचा गौरव करण्यात येतो.हा पुरस्कार भारतीय तसेच विदेशी व्यक्तीलाही दिला जातो .यंदाचा पद्मविभूषण पुरस्कार प्राप्त विदेशी व्यक्ती शिंजो आबे हे जपानचे माजी पंतप्रधान ठरले आहे. शिंजो आंबे याना हा पुरस्कार समाजासाठी त्यांनी केलेल्या कार्यासाठी त्यांना देण्यात आला. त्यांच्यासह आणखी सहा जणांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. 2021 मध्ये पद्माविभूषण पुरस्कार जाहीर करण्यात। आलेल्या व्यक्ती  पुढीलप्रमाणे -

नारिंदर सिंग

एस.पी.बालसुब्रह्मण्यम

शिंजो आबे



सुदर्शन साहू 
1.शिंजो आबे (जपानचे माजी पंतप्रधान ) 
2.एस.पी.बालसुब्रमण्यम (कला,मरणोत्तर)
3.डॉ.बेले मोन्नप हेगडे (औषधी ,कर्नाटक)

4.नरेंद्रसिंग कपणी(मरणोत्तर,विज्ञान व इन्जिनिअरिन्ग ) 

5.मौलाना व्हीदुद्दीन खान (दिल्ली,अध्यात्म ) 

6.बी.बी.लाल-(आर्कियोलॉजी,दिल्ली)

7.सुदर्शन साहू (कला क्षेत्र ,ओडिशा)



२.पद्म भूषण

पद्मभूषण हा पुरस्कार कला,उद्योग,शिक्षण व सामाजिक कार्यातील उच्चस्तरीय कार्यासाठी देण्यात येतो. वेगवेगळ्या क्षेत्रातील उच्चस्तरीय कार्याचा गौरव म्हणून भारतीय  व्यक्तीलाच हा पुरस्कार देण्यात येतो .यंदाचा 2021 मध्ये एकूण 10 व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात आला आहे, त्या व्यक्तीचे नावे पुढीलप्रमाणे आहे. 


ramvilas paswan



sumitra mahajan

1.श्रीमती कृष्णन नायर शांताकुमारी चीथारा (कला,केरळ)

2.तरुण गोगोई(मरणोत्तर )(आसाम,सार्वजनिक सेवा )

 3.चंद्रशेखर कंबारा(शिक्षण,कर्नाटक) 

4.श्रीमती सुमित्रा महाजन(सार्वजनिक सेवा,मध्यप्रदेश) 

5.नृपेंद्र मिश्रा,(सरकारी सेवा) 

6.रामविलास पासवान (मरणोत्तर )(सार्वजनिक सेवा बिहार) 

7.केशुभाई पटेल (गुजरात) (सार्वजनिक सेवा,मरणोत्तर) 

8.कलबे सादिक (मरणोत्तर,धार्मिक,उत्तरप्रदेश) 

9.रजनीकांत देविदास श्रॉफ(व्यापार व उद्योग,महाराष्ट्र) 

10.तरलोचन सिंग(सार्वजनिक सेवा,हरियाणा) 




3.पद्मश्री 


पद्मश्री हा पुरस्कार एखाद्या क्षेत्रात भारतीय व्यक्तीने किंवा विदेशी व्यक्तीने केलेल्या विशेष कार्यासाठी दिला
जातो .या पुरस्काराने सन्मानित करून त्या व्यक्तीचा गौरव करन्यात येतो .
महाराष्ट्रामधील पद्मश्री पुरस्कार विजेत्या व्यक्ती खालीलप्रमाणे-
1.सिंधुताई सपकाळ
2.परशुराम गंगावणे
3.गिरीश प्रभुणे
4.जयंतिबेन पोपट
5.रजनिकांत श्रॉफ
6.नामदेव कांबळे
rjnikant shrof

prshuram gangavne

                                                  


No comments:

Post a Comment