Sunday, January 31, 2021

31/01/2021

*राष्ट्रीय 

1.बिट कोईनसह सर्व प्रकारच्या आभासी चलनावर भारत सरकार आणणार बंदी .त्यासाठी येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधेयक मांडण्यात येणार आहे.



 2.यंदाची 2021 ची रणजी करंडक स्पर्धा रद्द करण्याचा भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआय ने निर्णय घेतला आहे. 87 वर्षात पहिल्यांदाच असे घडले आहे की यावर्षी रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा खेळवण्यात येणार नाही.रणजी क्रिकेट स्पर्धेची नुकसान भरपाई खेळाडूंना देण्यात येणार आहे.



3.आजपासून देशामध्ये पल्स पोलिओ मोहिमेस सुरुवात.

 *.राज्य 


1. महाराष्ट्र शासन लवकरच राज्यभरात अपात्र शिधापत्रिका शोधमोहीम राबवणार आहे. या मोहिमे अंतर्गत वार्षिक 1 लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पना असणाऱ्या सर् शासकीय व खाजगी नोकरदार अधिकाऱ्यांचे रेशन कार्ड रद्द करण्यात येणार आहे. 

 
2. सिरम इन्स्टिट्यूटची भागीदारी असलेल्या नोवाव्याक्स कंपनीची कोवोव्हाक्स ही कोरोनवरील लस जूनपर्यंत भारतात उपलब्ध होण्याचा अंदाज आदर पुनवला यांनी व्यक्त केला. 



3.आयआयटी मुंबईच्या शास्त्रज्ञांना एकाच मेमरीमधून दोन्ही कार्ये करण्याच्या तंत्रज्ञान प्रथनिक स्तरावर विकसित करण्यात यश मिळाले आहे.


 
4. प्रसिद्ध गझलकार इलाही जमादार यांचे निधन .



 
5.यंदाचा अर्थसंकल्प डिजिटल पद्धतीने होणार सादर, सर्व खासदारांना पेपर ऐवजी PENDRIVE चे होणार वाटप.


No comments:

Post a Comment