*राज्य-
1.आज 30 जानेवारी राष्ट्रपिता महात्मा गांधींची 72 वि पुण्यतिथी .
![]() |
| Mahatma gandhi |
2.महाराष्ट्र शासनाने ताळेबंदि 28 फेब्रुवारीपर्यंत वाढवली.
3.कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठामधील रसायनशास्त्राच्या प्राध्यापकाने व विद्यार्थ्याने तयार केलेल्या ब्रेस्ट कॅन्सरवरील औषधाला भारत सरकारने पेटंट प्रमाणपत्र दिले आहे.स्तनांच्या कर्करोगावर उपचार करताना वापरण्यात येणाऱ्या टामोक्सिफेन या औषधाचे दुष्परिणाम कमी करणाऱ्या फेरीसीफेन हे औषध तयार करण्यात त्यांना यश प्राप्त झाले.
*राष्ट्रीय-
1.ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल ने जारी केलेल्या भ्रष्टाचार आकलन निर्देशांकात भारताला 86 वे स्थान.एकू ण 180 देशांचे आकलन करण्यात आले त्यानुसार न्यूझीलंड व डेन्मार्क अग्रस्थानी आहेत.
2.टाटा ट्रस्टच्या पुढाकाराने सेंटर फॉर सोशल जस्टीस ,कॉमन कीज,सिएचआरआय,प्रयास,सेंटर फॉर लीगल पॉलिसी यांच्या जस्टीस रिपोर्ट अनुसार पोलीस दलातील महिला पोलिसांचे सर्वाधिक प्रमाण असणाऱ्या राज्यांमध्ये बिहार राज्य अग्रस्थानी आहे.तर हिमाचल प्रदेश व तमिळनाडू अनुक्रमे द्वितीय व तरतीय स्थान देण्यात आले आहे .
3. अर्थसंकल्प 2021 ची माहिती सर्वसामान्यांना कळण्यासाठी केंद्र सरकार युनियन बजेट नावाचे अप्लिकेशन आणणार.बजेट जाहीर झाल्यानंतर करता येणार डाउनलोड.
*आंतरराष्ट्रीय-
मायक्रोसॉफ्टने विकसित केले नवीन चाटबॉट नावाचे सॉफ्टवेअर . या सॉफ्टवेर द्वारे मृत व्यक्ती किंवा एका कृत्रिम व्यक्तिप्रमाणे बोलता येणार आहे.जवळच्या व्यक्तीची माहिती या सॉफ्टवेर मध्ये भरून तुम्हाला हा अनुभव मिळू शकतो.
*



No comments:
Post a Comment