*जन्म दिनांक -१८/०४/१८५८ ,शेरवली ,मुरुड महाराष्ट्र
ते एक समाजसुधारक होत.स्त्री शिक्षणासाठी त्यांनी स्वतःचे आयुष्य वेचले .
त्यांनी महिलांचे शिक्षण ,विधवा पुनर्विवाह यासाठी आहोरात्र कष्ट घेतले.
आपल्या पत्नी राधाबाई यांचे वयाच्या २७ व्या वर्षी बालान्त्पानाम्ध्ये मृत्यु झाला .त्या काळी मुलींची लहानपणी लग्न केली जात ,तर दुर्दैवाने पती मरण पावला तर तिला उर्वरित आयुष्य विधवा मनून काढावे लागे.अशी ती स्माजरीत नाकारणाऱ्या ककर्वे यांनी पंडिता रमाबाई यांच्या शारदा सदन मध्ये शिकणाऱ्या विधवा गोदुबाई हिच्याशी विवाह केला .त्यामुळे समाजाने त्यांच्यावर बहिष्कार घातला होता .
त्यांनी महाराष्ट्रात पुण्यातील हिंगण्याच्या माळरानावर एका झोपडीत सुरुवातीला मुलींची शाळा सुरु केली .
याच शाळेचे पुढे कर्वेंच्या अथक परिश्रमातून पुढे भारतातील पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना झाली .श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी हे ते पहिले महिला विद्यापीठ होय .महिला सबलीकरणासाठी कर्वे यांचे मोठे योगदान होते.
अशे हे महर्षी कर्वे १०४ वर्षांचे संपन्न आयुष्य जगले
त्यांना भारत सरकारने भारतरत्न या पुरस्काराने १९५८ साली सन्मानित करण्यात आले .
*मृत्यु दिनांक -
*०९/११/१९६२
*०९/११/१९६२

No comments:
Post a Comment