Thursday, November 12, 2020

दिनांक -१२/११/२०२०

दिनांक -१२/११/२०२० 

*आज पं.मदन मोहन मालवीय यांची पुण्यतिथी .
*जन्म दिन -२५/१२/१८६१ 
*प्रयागच्या ब्राम्हण कुटुंबामध्ये त्याचा जन्म झाला .त्यांच्या वडिलांचे     नाव  पंडित ब्रिजनाथ व आईचे नाव मुनादेवी होते .
*विद्यार्थी दशेमध्ये असताना ते मकरंद व झक्क्डसिंह या नावाने कविता   लेखनही केले .
*ते एक महान  कर्मयोगी होते .
*एक शिक्षक ,पत्रकार,समाजसुधारक ,संस्थापक होते .
*ते बनारस विश्व हिंदू विद्यापीठाचे संस्थापक होत.
*ते भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस चे सदस्य होते .तसेच हिंदू महासभेचे प्रणेते   होत .
*राष्ट्रीय सभेच्या मवाळ व जहाल गटांना जोडून ठेवण्याचे काम त्यांनी   केले.आपल्या मधुर वाणीने व वाक चातुर्याने ते इंग्रजांनाही प्रभावित करत   असत . 
*त्यांनी राष्ट्रीय कॉंग्रेसचे ४ वेळा अध्यक्षपद भूषविले .
*त्यांना २०१५ मध्ये भारत सरकारने मरणोत्तर भारतरत्न               पुरस्कार  देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे .


*प्रसिद्ध भारतीय पक्षी वैज्ञानिक डॉ.सलीम अली यांचा आज   जन्मदिन.
*पूर्ण नाव -सलीम मोइज़ुद्दिन अली  .
*जन्म दिनांक -१२/११/१८९६ ,मुंबई.
*डॉ .सलीम आली यांना भारताचा BIRDMAN म्हणूनही ओळखले जाते . 
*डॉ .सलीम आली हे भारतातील आद्य पक्षीशास्त्रज्ञ  म्हणून ख्यातनाम   आहेत .
*त्यांनी लिहिलेली द बुक ऑफ इंडिअन बर्डस, इंडिअन हिल बर्डस,हंड्बूकऑफ बर्डस इंडिया & पाकिस्तान हि त्यांच्या प्रसिद्ध पुस्तकांपैकी काही नावे .       
*त्यांना प्राप्त पुरस्कार -
१.भारतसरकारचा पद्मभूषण १९५८ 
२.पद्मविभूषण -१९७६ 
३.ब्रिटीश पक्षितज्ञ संघाचे राष्ट्रीय पदक -१९६७ 
४.हॉलंड सरकारचा ऑर्डर ऑफ गोल्डन अर्क 
*या पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला  आहे .
*त्यांनी  आयुष्यभर पक्षांचा अभ्यास केला .
*मृत्यु दिनांक -२० जून १९८७ 
*महाराष्ट्रात  त्यांचा जन्मदिन राष्ट्रीय पक्षी दिन म्हणून साजरा केला जातो .



देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिवाळीच्या एक दिवस आधी तिसर आर्थिक प्याकेज जाहीर .
काही दिवसांपूर्वीच production linked incentive (PLI)योजनेला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली .सरकारने पीआय यल मंजुरी देऊन पुढील ५ वर्षांसाठी १.४६ लाख कोटी रु पये देण्यात आले आहे . 



No comments:

Post a Comment