Wednesday, January 5, 2022

*प्रधानमंत्री स्वनिधी आत्मनिर्भर योजना 10,000रु मिळणार

PM SWANIDHI YOJNA 

*प्रधानमंत्री स्वनिधी  आत्मनिर्भर योजना


         नमस्कार मित्रानो स्वागत आहे रोजच्या चालू घडामोडी या ब्लोगमध्ये .आपण दररोज नवनवीन योजनांची माहिती आपल्या ब्लॉग द्वारे घेत असतो .तर आज आपण अशाच एका नव्या योजनेची माहीती घेणार आहोत.   
कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे सामान्य जनता त्रस्त झाली आहे.कोरोनाचा प्रभाव वाढल्यामुळे २०१९-२० या वर्षात छोट्या व्यापार्यांना मोठा आर्थिक फटका बसला .दैनदिन व्यवहारांवर आपले घर चालवणारे फिरते विक्रेते बेरोजगार बनले .अशा या रोजंदारी असणार्या लोकांकरिता अआर्थिक भांडवल उपलब्ध व्हावे या हेतूने केंद्र सरकारने पीएम स्वनिधी आत्मनिर्भर हि योजना तयार केलेली आहे .


*पीएम स्वनिधी आत्मनिर्भर योजनेचे स्वरूप -
 पीएम स्वनिधी या योजनेची सुरुवात जून २०२० मध्ये करण्यात आली .कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठकीमध्ये याबाबतचा निर्णय घेण्यात आला .या योजनेंतर्गत लहान दुकानदार ,फळ विक्रेते ,भाजी विक्रेते ,रस्त्यावर इतर वस्तू विकणाऱ्या छोट्या व्यापार्यांना १०००० रुपयांचे कर्ज देण्यात येते .या कर्जावर कमी व्याज आकारण्यात येते .याला प्रधानमंत्री स्ट्रीट वेंडर आत्मनिर्भर योजना असे नाव देण्यात आले आहेत .


या योजने अंतर्गत देण्यात येणाऱ्या या कर्जावर वार्षिक व्याज सबसिडी च्या स्वरूपात देण्यात येते .या योजने अंतर्गत घेतलेले हे कर्ज वेळेवर फेडणाऱ्या व्यक्तीस हे लाभ घेता येतात .
रस्त्याच्या कडेला फळे ,भाजीपाला विकणाऱ्या ,कपडे ,इतर वस्तू विकणाऱ्या व्यक्ती ,फिरस्त्या व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊन आर्थिक मदत प्राप्त करू शकतात .कोरोन काळामध्ये अर्थव्यवस्था रुळावर यावी तसेच अर्थव्यवस्थेचा महत्वाचा भाग असणार्या छोट्या व्यापार्यांना उभारी देणे हा योजनेचा मुख्य उद्देश आहे .

*स्ट्रीट वेंडर म्हणजे काय ?कोण कोण घेऊ शकते या योजनेचा लाभ !
स्ट्रीट वेंडर म्हणजे रस्त्याच्या कडेला फुटपाथवर वस्तू विकणारे व्यक्ती ,छोटे व्यापारी ,फिरस्ते व्यक्ती .रस्त्याच्या कडेला बसून विकणारे व्यक्ती जे आपल्या रोजंदारीवर अवलंबून असतात ,ज्यांचा उदरनिर्वाह त्या व्यवसायावर अवलंबून असतो त्या व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतात .हि योजना देशातील जवळपास ५० लाखांपेक्षा अधिक लोकांना प्रभावित करत आहे .



या योजनेचे लाभ घेऊ शकणारे -
१. रस्त्यावरील विक्रेते 
२. फळ विक्रेते 
३.भाजी विकेते 
४.फुटपाथवर वस्तू विकणारे 
५.रस्त्यावरील इतर विक्रेते 


*याची नोंदणी कुठे करता येणार ?
जवळील CSC सेंटर ,ऑनलाईन सर्विस सेंटर ,मल्टी सर्विस सेंटर मध्ये अर्ज करून मिळेल .  



No comments:

Post a Comment